FIFA : कतारमध्ये सध्या फिफा वर्ल्ड कपचा (FIFA World Cup 2022) थरार सुरु आहे. जगभरातील फुटबॉलप्रेमी कतारमध्ये (Qatar) दाखल झालेत. या वर्ल्ड कपसोबत दिग्गज खेळाडूंच्या नावांची चर्चा देखील सुरु आहे. मेस्सी, रोनाल्डो, नेयमार या खेळाडूंची नावे सर्वांच्याच ओठांवर असतात. पण मेस्सीचे जादुई गोल पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक हजेरी लावत असतात. महाराष्ट्राच्या कोल्हापुरातही (kolhapur) मेस्सीचे वेड मोठ्या प्रमाणात असल्याचे पाहायला मिळते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर (Shashi Tharoor) हे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. राजकीय विषयांव्यतिरिक्त इतर बाबतीतही ते आपली मते मांडत असतात. फिफा विश्वचषकाचे वेड शशी थरूर यांच्यावरही दिसून आल्याचे सध्या पाहायला मिळतेय. शशी थरूर यांनी मेस्सीचा एक फोटो शेअर केलाय जो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. थरूर यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये एका बाजूला अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) तर दुसऱ्या बाजूला एक भारतीय महिला दिसत आहे. मेस्सीने डोक्यावर फुटबॉल ठेवला आहे, तर भारतीय महिलेने डोक्यावर मडकी ठेवली आहेत.
आजही भारतातील महिला डोक्यावर पाण्याने भरलेली मडकी घेऊन जातात. या दरम्यान, त्यांचे संतुलन पाहण्यासारखे आहे. हा समतोल साधणे किती कठीण आहे हे फुटबॉलपटूच सांगू शकतो. कारण या खेळात समतोल तितकाच महत्त्वाचा आहे. थरूर यांनी शेअर केलेल्या फोटोतही एक महिला तिच्या डोक्यावर पाच मडक्यांचा तोल सांभाळत आहे, तर दुसऱ्याबाजूला मेस्सी त्याच्या डोक्यावर फुटबॉलचा तोल सांभाळत आहे.
Hats (& any other headgear) off to the intrepid Indian woman! pic.twitter.com/PaNNSI1zg6
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) November 25, 2022
थरूर यांनी या ट्विटसोबत निर्भय भारतीय स्त्रीला सलाम, असे म्हटले आहे. यासोबतच त्यांनी नेटकऱ्यांना मेस्सी चांगला आहे की मावशी? असा सवाल केला आहे. लोकांनाही थरूर यांच्या ट्विटला पसंती दिली आहे.