FIFA World Cup 2022 Viral Video : कतारमध्ये 21 नोव्हेंबरपासून फिफा वर्ल्डकप 2022 ला (FIFA World Cup 2022) सुरुवात झाली आहे. जगातील कानाकोपऱ्यातील लोक रात्री उशिरापर्यंत जागून हा मैदानातील रोमांचकारी आणि थरार पाहत आहेत. प्रत्यक्ष मैदानात जाऊन फुटबॉल मॅचचा (Football match) थरार अनुभवतात आहे. प्रसिद्ध फुलबॉलपटू नेमार (Neymar), ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि मेस्सी (Messi) यांचा गोल पाहून फुटबॉलप्रेमी (football lover) वेडे होतात. पोर्तुगाल विरुद्ध घानाच्या सामन्यात रोनाल्डोने गोल करत इतिहास रचला. फिफा वर्ल्ड कपच्या 5 एडीसनमध्ये गोल करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. पण तुम्ही कधी विमान गोल पाहिला आहे का?
सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे. यात प्रेक्षकाने कागदाचं विमान बनवलं आणि ते मैदानाकडे उडवलं. त्यानंतर या विमानाने जी कमाल केली. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडतो आहे. एका फुलबॉल चाहत्याने निव्वळ कंटाळवाणीतून कागदाचे विमान बनवले आणि या कागदी विमाने चक्क चमत्कारिकरित्या आपलं लक्ष्य गाठले. फुलबॉलप्रेमी फिफा वर्ल्डकपच्या फिव्हरमध्ये रमले असताना हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. (video FIFA World Cup 2022 fan scored paper airplane goal viral on Social media )
हा व्हिडिओ यावर्षी जूनमध्ये झालेल्या युनियन ऑफ युरोपियन फुलबॉल असोसिएशन (UEFA)नेशन्स लीगमधील आहे. जर्मन आणि इंग्लंड (Germany Vs England) यांच्यातील सामना सुरु असताना प्रेक्षकांमधील एकाने हे विमान बनवलं आणि नंतर ते सोशल मीडियावर व्हायरल झालं. हा व्हिडिओ पाहून नेटिझन्सच्या नजरा खिळल्या आहेत.
हा व्हिडिओ ट्विटरवर शाहिद फरीदी (Shahid Faridi) यांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, ''अविश्वसनीय लक्ष्य गोल!!!''
This is an unbelievable goal!!! pic.twitter.com/zatodUzBRN
— Shahid Faridi (@Shahid_Faridi_) November 24, 2022
42 सेकंदचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. हा व्हिडिओ पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता इंग्लंडचा कीपर जॉर्डन पिकफोर्डरही (England goalkeeper Jordan Pickforder) हा गोल वाचवू शकला नाही. या व्हिडिओवर यूजर्स वेगवेगळ्या कंमेट्स करत आहेत.