मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) शुक्रवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेवर कब्जा केला. सलग दोन सामने जिंकून संघाने 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 100 विजय मिळवणारा भारतीय संघ जगातील दुसरा संघ बनला आहे. (Indian Team became second team to record 100 wins in T20 Internationals)
इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात, शुक्रवारी इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि ऋषभ पंतच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने 20 षटकांत 5 बाद 186 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने 3 बाद 178 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या सामन्यात चुरशीची गोलंदाजी करत पाहुण्या संघाला धावा करण्याची संधी दिली नाही.
आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 100 सामने जिंकणारा भारत हा दुसरा संघ ठरला आहे. 155व्या T20I मध्ये 8 धावांनी रोमहर्षक विजयासह विजयाचे शतक पूर्ण केले. भारताने आतापर्यंत एकूण 97 सामन्यांत प्रतिस्पर्धी संघाला थेट मुसंडी मारली आहे. त्याचवेळी टाय मॅचमध्ये 3 विजय मिळवले आहेत. 2007चा टी-20 विश्वचषक पाकिस्तानविरुद्ध बॉल आऊटमध्ये जिंकला होता. याशिवाय दोन सुपर ओव्हरमधील विजयांचा समावेश आहे.
सर्वाधिक T20 सामने जिंकण्याच्या बाबतीत पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 189 टी-20 सामने खेळून एकूण 117 जिंकले आहेत. तीन सामने बरोबरीत आहेत तर पाच निकाल लागले नाहीत. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त कोणत्याही संघाने 100 टी-20 सामने जिंकलेले नाहीत.