मुंबई : नाताळ किंवा Christmas ख्रिसमस म्हटलं की आनंदी आणि उत्साही वातावरणाणध्ये एका गोष्टीची सर्वांनाच प्रतिक्षा लागून राहिलेली असते. ती म्हणजे ला़डक्या सँटाक्लॉजची. तो असे दूर देशातून येतो आणि आपण झोपी गेलेलो असतानाच तो आपल्यासाठी अगदी आपल्याच आवडीच्या भेटवस्तू ठेवून जातो. सँटाक्लॉज किंवा हा नाताळबाबा इतका म्हातारा असूनही कसा बुवा येतो दरवर्षी, हा असंख्यजणांच्या मनात घर करणारा एक नियमित प्रश्न.
जशी या प्रश्नाची उत्तरं आणि खऱ्या Santa Claus सँटाक्लॉजची प्रतिक्षा शोध घेऊनही पूर्ण होत नाही तसंच दरवर्षी सँटाही त्याची वाट पाहणाऱ्यांना आनंदाचे कताही क्षण देण्यास विसरत नाही. यंदा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार Virat Kohli विराट कोहली याने काही मुलांसाठी असंच थेट सँटाक्लॉज होण्याचं ठरवलं.
'स्टार स्पोर्स्ट्स'च्या एका सुरेख उपक्रमाअंतर्गत विराटने हे रुप धारण केलं. ख्रिसमसच्या काही दिवसांपूर्वीच त्याने कोलकाता येथील एका 'चिल्ड्रन्स शेल्टर होम'ला भेट दिली. यावेळी स्पायडर मॅन वगैरेपासून सुरू झालेल्या या लहानग्यांच्या गप्पा थेट सचिन, विराटपर्यंत येऊन पोहोचल्या. याला अर्थातच जोड होती ती म्हणजे ख्रिसमसच्या गीतांची आणि एका निखळ आनंदपर्वाची.
वाचा : विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ
सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये हे सुरेख क्षण पाहायला मिळत आहेत. जेथे विराट त्याचं रुप बदलून बच्चेकंपनीसाठी खूप साऱ्या भेटवस्तू आणताना दिसतो. ही देवाणघेवाण झाल्यानंतर तो आपल्या खोट्या दाढीमिशा काढत, सँटाक्लॉजहून विराट होतो आणि बस्स.... पुढे काय. हा अनोखा आणि हवाहवाला विराटरुपी सँटा पाहून बच्चेकंपनीचा एकच कल्ला पाहायला मिळतो. आनंद, प्रेम, उत्साह या साऱ्यासोबत अनेक नि:स्वार्थ भावना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत.
Watch @imVKohli dress up as and bring a little Christmas cheer to the kids who cheer our sportspersons on, all year long!
This joyful season, let’s remember to spread the love. pic.twitter.com/VF8ltmDZPm
— Star Sports (@StarSportsIndia) December 20, 2019
बच्चेकंपनीला तर विराटने सँटा होऊन धमाल भेट दिली.... तुम्हाला भेटला का असाच कुणी सँटा... ?
#MerryChrismas