ऋषभ पंतला दणका, खास प्रशिक्षक शाळा घेणार

एमएस धोनीनंतर ऋषभ पंतला टीम इंडियामध्ये वारंवार संधी देण्यात आली आहे.

Updated: Dec 24, 2019, 10:04 PM IST
ऋषभ पंतला दणका, खास प्रशिक्षक शाळा घेणार title=

मुंबई : एमएस धोनीनंतर ऋषभ पंतला टीम इंडियामध्ये वारंवार संधी देण्यात आली आहे. पण ऋषभ पंतला अजून तरी या संधीचं सोनं करता आलेलं नाही. विकेट कीपिंग करताना केलेल्या चुका, बॅटिंगवेळी खराब शॉट मारणं आणि डीआरएसबाबत चुकीचा निर्णय घेणं, या कारणांमुळे पंत चर्चेत राहिला आहे. नुकत्याच कटकमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडेमध्ये पंतने एक दोन नव्हे तर तब्बल तीन कॅच सोडले.

२५व्या ओव्हरमध्ये ऋषभ पंतने शिमरन हेटमायरला अगदी सोपा कॅच सोडला. यानंतर हेटमायरने ३७ रन केले, अखेर नवदीप सैनीने हेटमायरला माघारी धाडलं. नवदीप सैनीची वनडे क्रिकेटमधली ही पहिली विकेट ठरली.

ऋषभ पंतच्या या खराब कामगिरीनंतर आता ऋषभ पंत विकेट कीपिंगसाठी खास प्रशिक्षकाकडून मार्गदर्शन घेणार आहे. टीम इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी ही घोषणा केली आहे. ऋषभ पंतला त्याची विकेट कीपिंग सुधारण्याची गरज आहे, असं परखड मत एमएसके प्रसाद यांनी मांडलं आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० आणि वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचा विजय झाला. यानंतर आता विराटची टीम श्रीलंकेविरुद्ध टी-२० सीरिज आणि मग ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सीरिज खेळणार आहे. रोहित शर्माला टी-२० सीरिजसाठी तर मोहम्मद शमीला दोन्ही सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तर शिखर धवन आणि जसप्रीत बुमराह यांचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० साठी भारतीय टीम

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी भारतीय टीम

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह