इंग्लंडविरुद्धच्या वनडेमध्ये भारतानं टॉस जिंकला

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारतानं टॉस जिंकला आहे. 

Updated: Jul 12, 2018, 05:06 PM IST
इंग्लंडविरुद्धच्या वनडेमध्ये भारतानं टॉस जिंकला  title=

ट्रेन्ट ब्रिज : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. ३ वनडे मॅचच्या सीरिजमधली पहिली वनडे आज नॉटिंगहॅमच्या ट्रेन्ट ब्रिजमध्ये खेळवण्यात येत आहे. ही मॅच सुरु व्हायच्या आधीच भारताला धक्का बसला आहे. दुखापत झालेला भुवनेश्वर कुमार या मॅचला मुकला आहे. ३ टी-२० मॅचची सीरिज २-१नं जिंकल्यामुळे भारतीय टीमचा आत्मविश्वास दुणावला आहे. आता वनडे सीरिज जिंकण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरत आहे. 

भारतीय टीम 

रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, विराट कोहली, सुरेश रैना, एम एस धोनी, हार्दिक पांड्या, सिद्धार्थ कौल, उमेश यादव, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव

इंग्लंडची टीम

जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रुट, इओन मॉर्गन, बेन स्टोक्स, जॉस बटलर, मोईन अली, डेव्हिड विली, लियाम प्लंकेट, आदिल रशिद, मार्क वूड

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा