मुंबई : सोशल मीडियावर जवळपास प्रत्येक दिवशी सेलिब्रिटीच्या मृत्यूची अफवा पसरवली जाते. आता पाकिस्तानचा माजी ऑल राऊंडर अब्दुल रझाक याच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर पसरवण्यात आली. अब्दुल रझाकचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची ही अफवा वेगानं पसरली आणि मोठ्या प्रमाणावर शेअरही करण्यात आली. ही अफवा व्हायरल झाल्यानंतर खुद्द अब्दुल रझाक स्वत: समोर आला आणि त्यानं ट्विटर आणि फेसबूकवर एक व्हिडिओ शेअर केला.
अब्दुल रझाकचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी कोणीतरी फेसबूकवर टाकली. पण या अफवेमुळे मला दु:ख झालं. अशा प्रकारच्या अफवा पसरवू नका. मी ठिक आहे, असं रझाक या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे.
पाकिस्तानकडून खेळताना रझाकनं ४६ टेस्ट मॅचमध्ये १९४६ रन केल्या. तर २६५ वनडेमध्ये त्यानं ५०८० रन केल्या. यामध्ये ३ शतकं आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहे. ४६ टेस्ट मॅचमध्ये रझाकनं १०० विकेट आणि वनडेमध्ये त्यानं २६९ विकेट घेतल्या.
Abdul Razzaq "I am alive, not dead" pic.twitter.com/VO4TX6iHDY
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) July 10, 2018