टीम इंडियाला मोठा धक्का, विंडीज मालिकेपूर्वी 'हा' खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह

विंडीज मालिकेआधी टेन्शन वाढलं, 'या' खेळाडूला कोरोनाची लागण 

Updated: Jul 21, 2022, 09:17 PM IST
टीम इंडियाला मोठा धक्का, विंडीज मालिकेपूर्वी 'हा' खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह  title=

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 वन डे सामन्यांची सीरिज 22 जुलैपासून सुरू होत आहे. या मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. कारण टीम इंडियाचा स्टार फलंदाज कोरोना प़ॉझिटीव्ह आढळलाय. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय.

टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.  दरम्यान आधीच राहुलचे जर्मनीत यशस्वी ऑपरेशन पार पडले होते. त्यानंतर तो मायदेशी परतला होता. त्यानंतर आता राहुल बंगळुरू येथील एनसीएमध्ये (NCA)नितीन पटेल यांच्या देखरेखीखाली रिकव्हर होत आहे. मात्र या दरम्यानचं तो कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. त्यामुळे टीम इंडियाची चिंता वाढलीय. आता तो मैदानात कधी पररतोय याची उत्सुकता चाहत्यांना लागलीय. 

गेल्या महिन्यात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी राहुलची भारतीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती, परंतु पहिला सामना सुरू होण्यापूर्वीच राहुल दुखापतीमुळे संपूर्ण पाच सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला होता. यानंतर राहुलला संपूर्ण इंग्लंड दौऱ्यातून बाहेर राहावे लागले होते. 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी राहुलचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, त्याची उपस्थिती फिटनेस चाचणीवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे तो सामन्याआधी मैदानात परततो का हे पहावे लागणार आहे.