IND vs WI: पहिल्या टी 20 ला रोहितसोबत ओपनिंग कोण करणार?

वेस्ट इंडिज विरुद्ध आज टी 20 सीरिजमधील पहिला संध्याकाळी 8 वाजता होणार आहे. 

Updated: Jul 29, 2022, 06:51 PM IST
IND vs WI: पहिल्या टी 20 ला रोहितसोबत ओपनिंग कोण करणार?  title=

मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्ध आज टी 20 सीरिजमधील पहिला संध्याकाळी 8 वाजता होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. तर आता पराभवाचा बदला घेण्यासाठी वेस्ट इंडिज तयारीत आहे. के एल राहुल टीममधून बाहेर झाल्याने आता रोहित शर्मासोबत ओपनिंग कोण करणार असा प्रश्न आहे.
 
वसीम जाफरने ओपनिंगबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. सामन्याआधी एक मोठी अपडेट येत आहे. ऋषभ पंत किंवा ईशान किशन रोहितसोबत ओपनिंगसाठी उतरण्याची शक्यता आहे. 

केएल राहुलला कोरोना झाला. तो अजून पूर्णपणे बरा झाला नाही. त्यामुळे त्याला पहिल्या सामन्यातून आराम देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत राहुलच्या अनुपस्थितीत पंत रोहितसोबत ओपनिंगसाठी उतरण्याची शक्यता आहे. 

भारताचा माजी खेळाडू वसीम जाफरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट केली. ज्यामध्ये त्याने तीन खेळाडूंची नावे दिली आहेत. यात रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव दिसत आहेत. वसीम जाफरच्या मते, ऋषभ पंत रोहित शर्मासोबत ओपनिंग करू शकतो. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर उतरण्याची शक्यता आहे.