मुंबई: टीम इंडियाची A टी 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध कसोटी सीरिज होणार आहे. तर दुसरीकडे B टीम श्रीलंका दौऱ्यासाठी तयारी सुरू करत आहे. या B टीमचे कोच राहुल द्रविड तर कर्णधार म्हणून शिखर धवनची निवड करण्यात आली आहे.
पृथ्वी शॉ श्रालंका दौऱ्यासाठी टीम B कडून खेळणार आहे. यावेळी त्याने आपल्या संघाच्या कोचची का भीती वाटते याबाबत खुलासा केला आहे. पृथ्वीने क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीनुसार ' 2 वर्षांपूर्वी अंडर 19 संघात असताना राहुल द्रविड सरांसोबत टूर केली होती. त्यांना हे माहिती होतं की आम्ही खूप वेगळे आहोत. म्हणून त्यांनी त्यांच्यासारखं खेळण्यासाठी कधीच दबाव आणला नाही. मला माझ्या खेळाबाबत कोणतीही गोष्ट त्यांनी बदलू नये असंच सांगितलं. द्रविड सर नेहमी मला नैसर्गिक पद्धतीनं खेळायला सांगायचे.'
पृथ्वी शॉ अंडर 19 चा कर्णधार असताना त्यांनी वर्ल्डकप जिंकून आणला त्यावेळी संघाचे कोच राहुल द्रवीड होते. 'जेव्हा द्रविड सर असतात तेव्हा तुम्हाला जास्त शिस्तीत राहावं लागतं. त्याची थोडी भीती वाटते पण मैदानाबाहेर ते आमच्यासोबत मित्रासारखे राहात होते.'
राहुल द्रविड सर आमच्यासोबत जेवायला देखील यायचे. लेजेंड खेळाडूसोबत जेवायला जाण्याचं माझं स्वप्न राहुल सरांमुळे पूर्ण झालं अशी भावना पृथ्वी शॉनं व्यक्त केली आहे.
टीम इंडिया या दौऱ्यासाठी 5 जुलैला श्रीलंकेत दाखल होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया वनडे आणि टी 20 सीरिज खेळणार आहे. या दोन्ही मालिकेत प्रत्येकी 3 सामने खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 13 जुलैपासून होणार आहे. 13, 16 आणि 19 जुलैला वनडे सामने खेळवण्यात येणार आहेत. तर त्यानंतर 22, 24 आणि 27 जुलैला टी 20 मॅच खेळवल्या जातील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्व सामन्यांचे आयोजन कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियममध्ये करण्यात आले आहे.