Zee Real Heroes Awards 2024: 'इम्पॅक्ट पर्सनॅलिटी ऑफ द ईयर' अवॉर्डचा मानकरी ठरला अजय देवगण

Zee Real Heroes Awards 2024 : अजय देवगणला  झी रिअल हीरोज अ‍वॉर्ड 2024 मध्ये 'इम्पॅक्ट पर्सनॅलिटी ऑफ द ईयर' अ‍वॉर्डने सन्मानित केले गेले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार देण्यात आला.  

Updated: Jan 15, 2025, 05:41 PM IST
Zee Real Heroes Awards 2024: 'इम्पॅक्ट पर्सनॅलिटी ऑफ द ईयर' अवॉर्डचा मानकरी ठरला अजय देवगण title=

Zee Real Heroes Awards 2024 : लोकप्रिय अभिनेता अजय देवगणने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूड सिनेसृष्टीत स्वत:ची छाप पाडून आपली वेगळी ओळख निर्माण केली. अजयने एकाहून एक असे हीट चित्रपट दिले. आपल्या अभिनयामुळे अजयने चित्रपटसृष्टीत कित्येक अ‍वॉर्ड्स प्राप्त केले आहेत. मागील वर्षीच प्रदर्शित झालेल्या 'सिंघम अगेन' चित्रपटाने मोठं यश संपादन केलं आहे. या चित्रपटातील अजयने साकारलेल्या भूमिकेमुळे त्याला झी रिअल हीरोज अवॉर्ड 2024 मध्ये 'इम्पॅक्ट पर्सनॅलिटी ऑफ द ईयर' अ‍वॉर्डने सन्मानित केले गेले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार देण्यात आला. फक्त अभिनय कार्यक्षेत्रातच नव्हे तर चित्रपटाचा निर्माता आणि निर्देशक म्हणून सुद्धा त्याने उत्तमरित्या कामगिरी पार पाडली. या चित्रपटामुळे त्याला आणखीनच लोकप्रियता मिळाली. 

'मेगा परफॉर्मर ऑफ द ईयर' पुरस्कार

अजय देवगणने चित्रपटात अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. अनेकदा आपल्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांचे लक्ष खिळवून ठेवले. त्याने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत वैविध्य पाहायला मिळतं. एक्शन, रोमांस आणि कॉमेडी भूमिकेमुळे चाहत्यांचे मनोरंजन करण्यात तो कधीही कमी पडला नाही. बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्यांमध्ये अजय देवगणचं नाव घेतलं जातं. त्याच्या उत्तम अभिनयामुळे आणि भारतीय सिनेसृष्टीतीत त्याने दिलेल्या योगदानामुळे त्याला 'मेगा परफॉर्मर ऑफ द ईयर' हा पुरस्कार प्राप्त झाला. 2024 हे वर्ष तर त्याच्या करिअरमधील अत्यंत खास वर्ष ठरलं. या वर्षात त्याचे बरेचसे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. 'भोला' या चित्रपटातील अजयची धाडसी आणि प्रामाणिक व्यक्तीची भूमिका तर कित्येक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. 
'मैदान' या चित्रपटात अजय प्रसिद्ध फूटबॉल कोच या प्रमुख भूमिकेत झळकला. या त्याच्या भूमिकेने सुद्धा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं. 'सिंघम अगेन' या चित्रपटातील त्याची पोलीस अधिकाऱ्याची भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या व्यतिरिक्त ‘शैतान’, ‘औरों में कहां दम था’ आणि ‘नाम’ हे त्याच्या अभिनय कार्यक्षेत्रातील यशस्वी चित्रपट ठरले. 

 

निर्माता आणि निर्देशक म्हणून सुद्धा केले काम

आपल्या दमदार अभिनयासोबत अजय देवगणने निर्माता आणि निर्देशकच्या रुपात सुद्धा आपली छाप सोडली. भारतीय सिनेसृष्टीत त्याने निर्माता आणि निर्देशक म्हणून मोलाचे योगदान दिले. मनोरंजन विश्वात त्याने साकारलेल्या भूमिकेमुळे आणि निर्माता तसेच निर्देशक म्हणून केलेल्या कामगिरीबद्दल त्याला 'इम्पॅक्ट पर्सनॅलिटी ऑफ द ईयर' अ‍वॉर्डने सन्मानित केले गेले. यामुळे चाहत्यांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच, चाहते आता अजय देवगणच्या पुढे येणाऱ्या चित्रपटाला घेऊन उत्सुक आहेत.