'माझा इतका अपमान झाला, भीकही मागू शकत नाही,' तरुणीने मारहाण केल्यानंतर रिक्षाचालक हतबल; ती म्हणते 'मी तर...'

Viral Video: व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रिक्षाचालकाने पोलीस ठाण्यात महिलेविरोधात तक्रार दाखल केली असून न्याय देण्याची मागणी केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 15, 2025, 04:36 PM IST
'माझा इतका अपमान झाला, भीकही मागू शकत नाही,' तरुणीने मारहाण केल्यानंतर रिक्षाचालक हतबल; ती म्हणते 'मी तर...' title=

Viral Video:उत्तर प्रदेशात एक तरुणी रिक्षाचालकाला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मिर्झापूरमध्ये ही घटना घडली होती. भाड्यावरुन हा वाद झाला होता असा दावा आहे. मात्र तरुणीने रिक्षाचालकाने चुकीचा शब्द वापरल्याने आपण त्याला मारहाण केली असा दावा केला आहे. आपल्याला तेव्हापासून धमकीचे फोन येत आहेत असाही आरोप तिने केला आहे. 

व्हिडीओत प्रियांशी पांडे नावाची तरुणी रिक्षाचालक विमलेश कुमार यांना बाहेर ओढण्याचा प्रयत्न करत, मारहाण करताना दिसत आहे. यावेळी विमलेश कुमार दोन्ही हात जोडून विनंती करत असतानाही प्रियांशी मात्र माघार घेत नव्हती असं व्हिडीओत दिसत आहे. 

तरुणीने नंतर हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटला अपलोड केला. त्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रिक्षाचालकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आपल्याला न्याय मिळावा अशी त्याची मागणी आहे. हाणामारी कशामुळे झाली याबद्दल ऑटो चालक आणि महिलेने परस्परविरोधी दावे केले आहेत.

मी भाडं देण्यास सांगितलं असता तरुणीने मला मारहाण करण्यास सुरुवात केली असा रिक्षाचालकाचा दावा आहे. "जेव्हा मी त्यांना ड्रॉप केलं आणि भाड्याची मागणी केली तेव्हा आम्ही विद्यार्थी आहोत सांगत त्यांनी नकार दिला. जेव्हा मी त्यांच्याकडे सतत भाड्याची मागणी करु लागलो तेव्हा एकाने माझी कॉलरर पकडली. यानंतर आपला मोबाईल बहिणीला देऊन सर्व रेकॉर्ड करण्यास सांगितलं. मी त्यांना मला भाडं नको असं सांगितलं. मी त्यांना हातही लावला नाही," असं रिक्षाचालकाने सांगितलं आहे.

त्याने म्हटलं आहे की, व्हिडीओ पाहिल्यानंतर मला इतकं अपमानजक वाटत आहे. त्यामुळेच मी पोलिसांकडे गेलो. "त्यांनी व्हिडीओ तयार केला आणि इंस्टाग्रामला टाकून माझी बदनामी केली. माजा इतका अपमान झाला आहे की, आता भीकही मागू शकत नाही. मला न्याय मिळायला हवा", असं रिक्षाचालकाने सांगितलं आहे. त्याने आपल्या छातीवरच्या जखमाही दाखवल्या आहेत. 

प्रियांशी पांडेच्या इंस्टाग्राम हँडलवर अनेक पोस्ट आणि रील्स आहेत ज्यामध्ये बंदूक घेऊन पोझ देणारी एक पोस्ट देखील आहे. तिचे 28 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. काल संध्याकाळी एका व्हिडिओ स्टेटमेंटमध्ये तिने आरोपांना उत्तर दिलं आणि सांगितलं की त्या माणसाने अश्लील भाषा वापरली आहे. "म्हणूनच मी त्याला मारहाण केली. मी माझ्या वैयक्तिक आयडीवरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मला धमक्यांचे फोन येत आहेत, त्यानंतर ," असं तिने म्हटलं आहे. मिर्झापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.