IND VS NZ : सीरिज सुरु होण्याआधीच भारताला धक्का? 3-0 व्हाइटवॉश अशक्यच कारण...; WTC Final चं तिकीटही धोक्यात

IND VS NZ Weather Report 1st Test Bengaluru : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला न्यूझीलंड सीरिज देखील क्लीन स्वीप देऊन जिंकावी लागेल. मात्र टीम इंडियाच्या या मनसुब्यावर पाणी फेरण्याची शक्यता आहे. 

पुजा पवार | Updated: Oct 15, 2024, 05:01 PM IST
IND VS NZ :  सीरिज सुरु होण्याआधीच भारताला धक्का? 3-0 व्हाइटवॉश अशक्यच कारण...; WTC Final चं तिकीटही धोक्यात title=
(Photo Credit : Social Media)

India vs Bengaluru Weather Report 1st Test Bengaluru: बांगलादेशला टेस्ट सीरिजमध्ये 2-0 ने क्लीन स्वीप दिल्यावर टीम इंडियाचं पुढचं टार्गेट आता न्यूझीलंड विरुद्ध होणारी टेस्ट सीरिज आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला न्यूझीलंड सीरिज देखील क्लीन स्वीप देऊन जिंकावी लागेल. मात्र टीम इंडियाच्या या मनसुब्यावर पाणी फेरण्याची शक्यता आहे. 16 ऑक्टोबर पासून बंगळुरू येथे होणाऱ्या टेस्ट सामन्यात पाचही दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मंगळवारी टीम इंडियाचं सराव सत्र सुद्धा पावसामुळे रद्द करावं लागलं.  

कसा आहे हवामानाचा अंदाज? 

बंगळुरूच्या एम चिन्नस्वामी स्टेडियमवर 16 ते 20 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला टेस्ट सामना पार पडणार आहे. या दरम्यान हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला असून यानुसार 16 ऑक्टोबर पहिल्याच दिवशी बंगळुरू भागात 92%  टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. तर 17 ऑक्टोबर दुसऱ्या दिवशी 79 %, तिसऱ्या दिवशी 62%, चौथ्या दिवशी 64% आणि पाचव्या दिवशी 77% पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. 

WTC Final चं तिकीट धोक्यात?

टीम इंडियाने बांगलादेश विरुद्ध टेस्ट सीरिज जिंकल्याने भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये पहिलं स्थान पक्कं केलं होतं. पॉईंट टेबलमध्ये टीम इंडिया नंबर 1 वर असून भारताने आतापर्यंत 11 पैकी 8 सामने जिंकलेत तर 2 सामन्यात पराभूत झाले आणि एक सामना ड्रॉ झाला. भारताच्या विजयाची टक्केवारी 74.24 टक्के आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठण्यासाठी भारताला 8 टेस्ट सामन्यापैकी 4 टेस्ट सामने जिंकावे लागतील. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी आता भारत न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची टेस्ट सीरिज आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळणार आहे. यापैकी न्यूझीलंड सीरिज भारतात  होईल तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांची बॉर्डर गावस्कर टेस्ट सीरिज खेळण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाचा दौरा करावा लागेल. 

हेही वाचा : उद्यापासून भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिली टेस्ट मॅच, फ्रीमध्ये कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

 

भारत मागील अनेक वर्षांपासून होम टेस्ट सीरिजमध्ये पराभूत झालेला नाही. तसेच भारत विरुद्ध न्यूझीलंड टेस्ट सामन्याचा इतिहास पाहिला तर न्यूझीलंडला भारतात टीम इंडिया विरुद्ध एकाही टेस्ट सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्ध तीनही सामने जिंकल्यास भारताचं WTC Final चं तिकीट जवळपास निश्चित झालं असतं. परंतु बंगळुरू येथे सामन्यावर पावसाचं सावट असल्याने हा सामना रद्द होऊ शकतो. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरिज भारतासाठी सोपी राहणार नाही. त्यामुळे बंगळुरूमध्ये होणाऱ्या सामन्यात पावसाने अडथळा निर्माण केल्यास भारताचं WTC Final चं तिकीट धोक्यात येऊ शकतं. 

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद सिराज, आकाश दीप

राखीव खेळाडू -  हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, मयंक यादव आणि प्रसिद्ध कृष्णा