दुबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्या बॅट अखेर तळपली आहे. दुबळ्या हाँगकाँग विरूद्धच्या सामन्यात विराटने अर्धशतक ठोकलंय. टी20 च्या 101 व्या सामन्यात त्याने हे अर्धशतक झळकावलं आहे. विराट पाठोपाठ सुर्यकुमार यादवने देखील अर्धशतक झळकावलं आहे. या बळावर टीम इंडियाने 2 विकेट गमावून 192 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे आता हाँगकाँग समोर 193 धावांचे आव्हान असणार आहे.
गेल्या अडीच वर्षापासून विराटच्य़ा बॅटीतून रन्सचं येत नव्हते. शतक आणि अर्धशतक झळकावून त्याला 1000 दिवस उलटले होते. त्यामुळे त्याच्या शतकाचा दुष्काळ संपत नव्हता.त्यामुळे विराटवर सतत टीका होत होती. मात्र आज त्याने टीकाकारांना प्रतिउत्तर देत अर्धशतक झळकावलं आहे.
विराटने या सामन्यात सावध खेळी करत आपली विकेट जाऊन दिली. फास्ट फॉरमॅट असलेल्या टी20मध्ये 40 बॉल्समध्ये अर्धशतक झळकावलं आहे. या खेळीत त्याने 1 फोर आणि दोन सिक्स ठोकले आहेत. विराट कोहलीची ही खेळी खुपच संथ असल्याने त्याच्यावर टीका देखील झाली. मात्र तो पुन्हा लयीत आल्याने आशिया कपच्या दृष्टीने टीम इंडियासाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. दरम्यान आता आक्रमक विराट कोहली कधी पाहायला मिळेल अशी अपेक्षा क्रीडा प्रेमी व्यक्त करत आहेत.
सुर्य तळपला
विराट कोहली पाठोपाठ आता सुर्यकुमार यादवने देखील अर्धशतक झळकावलं आहे. सुर्यकुमार यादवने 26 बॉलमध्ये हे 68 धावांची तुफानी खेळी केली आहे. या खेळीत त्याने 6 सिक्स आणि 6 फोर मारले आहेत. त्याआधी रोहीत शर्मा 21 आणि के एल राहूलने 36 धावा केल्या आहेत. या बळावर टीम इंडियाने 2 विकेट गमावून 192 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे आता हाँगकाँग समोर 193 धावांचे आव्हान असणार आहे.