India vs Hong Kong : हाँगकाँग विरूद्धच्या सामन्यात भारताचे 13 खेळाडू मैदानात!

हाँगकाँगकडून टीम इंडिया विरुद्ध खेळणाऱ्या भारतीय वंशाच्या 'या' खेळाडूंबाबत जाणून घ्या

Updated: Aug 31, 2022, 08:44 PM IST
 India vs Hong Kong :  हाँगकाँग विरूद्धच्या सामन्यात भारताचे 13 खेळाडू मैदानात! title=

दुबई : आशिया कपमध्ये (Asia cup 2022) आज टीम इंडिया-हाँगकाँगमध्ये (India vs Hong Kong) सामना सुरु आहे. या सामन्याचा टॉस हाँगकाँगने जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला असून टीम इंडिया (Team India) प्रथम बॅटींग करत आहे. या हाँगकाँग विरूद्धच्या सामन्यात भारताचे 13 खेळाडू मैदानात दिसणार आहे. मात्र संघ तर 11 खेळाडूंचा असतो मग 13 खेळाडू कसे असा प्रश्न साहजिक तुम्हाला पडला असेल. त्यामुळे 13 खेळाडू कसे ते जाणून घ्या.  

हाँगकाँग (Hong Kong) संघात भारतीय वंशाचे चार खेळाडू आहेत. यामधील दोन खेळाडू टीम इंडिया विरूद्धच्या सामन्यात हाँगकाँगचं प्रतिनिधित्व करतायत. त्यामुळे एकूण 13 भारतीय खेळाडू मैदानात दिसणार आहेत. दरम्यान हे चार खेळाडू कोण आहेत, ते जाणून घेऊयात.  

किंचित शाह 
हाँगकाँग संघाचा उपकर्णधार आणि यष्टिरक्षक किंचित शाह टीम इंडिया विरूद्ध सामना खेळत आहे. किंचित शाह
हा भारतात जन्मला आहे. त्याचा जन्म 9 डिसेंबर 1995 रोजी मुंबईत झाला आहे. त्याला निनाद शाह नावाचा भाऊ देखील आहे जो हाँगकाँगमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळतो.

आशिया कपमध्ये संघातील सध्याच्या हाँगकाँग संघातील शाह हा सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत 43 T20I सामने खेळले आहेत, 110 च्या जवळपास स्ट्राइक रेटने 633 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 79 आहे, तर त्याने 39 T20I डावात 50 चौकार आणि 14 षटकार मारले आहेत. 

शाहने हाँगकाँगसाठी तीन सामन्यांत 40 धावा केल्या होत्या. त्याचा स्ट्राईक रेट 105.26 होता आणि त्याची बॅटिंग सरासरी 40 होती.

आयुष शुक्ला
हाँगकाँग संघातून भारतीय वंशाचा आयुष शुक्ला टीम इंडिया विरूद्ध सामना खेळत आहे. आयुष शुक्ला हा आशिया चषक 2022 मध्ये सहभागी होणार्‍या सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक आहे. 

गेल्या वर्षी हाँगकाँग ऑल-स्टार्स 50-षटकांच्या स्पर्धेदरम्यान 19 वर्षीय खेळाडूने त्याच्या प्रभावी वेगवान गोलंदाजीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. शुक्लाने या वर्षाच्या सुरुवातीला युगांडाविरुद्ध टी20 मध्ये पदार्पण केले. त्याने आत्तापर्यंत पाच टी-20 सामन्यांमध्ये हाँगकाँगचे प्रतिनिधित्व केले असून पाच विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 3/30 आहे. आशिया चषक पात्रता फेरीत त्याने दोन सामने खेळले आणि चार विकेट घेतल्या.

अहान त्रिवेदी
आशिया चषक 2022 साठी हाँगकाँग संघात उपस्थित असलेला आणखी एक तरुण म्हणजे त्यांचा 17 वर्षीय ऑफस्पिनर अहान त्रिवेदी. धतो गेल्या वर्षी हाँगकाँग लीग वन-डे स्पर्धेत कोलून सीसीकडून खेळला होता. गेल्या पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये त्रिवेदीने सात विकेट्स घेतल्या. आशिया चषक पात्रता फेरीत त्याला एकही खेळ न मिळाल्याने, हाँगकाँग आज रात्री अहानचा गूढ शस्त्र म्हणून वापर करू शकेल.

धनंजय राव
डावखुरा वेगवान गोलंदाज धनंजय रावने हाँगकाँगसाठी कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाही, परंतु आजच्या सामन्यात त्याची वर्णी लागण्याची शक्यता होती. मात्र त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही.  

राव गेल्या वर्षी हाँगकाँग ऑल स्टार्स 50 ओव्हर्सच्या मालिकेत आयलँडर्सकडून खेळला होता. त्याने संघासाठी दोन सामने खेळून पाच विकेट्स घेतल्या. आज रात्री तो पदार्पण करतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

दरम्यान भारतीय वंशाचे हे खेळाडू टीम इंडिया विरूद्ध कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.