IND vs BAN : काळजावर दगड ठेऊन रोहितला घ्यावा लागणार 'हा' निर्णय, पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

India vs Bangladesh 1st Test : येत्या 19 तारखेपासून भारत आणि बांगलादेशदरम्यान कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामने खेळले जाणार आहे. यातल्या पहिल्या चेन्नई टेस्टमध्ये टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? 

राजीव कासले | Updated: Sep 9, 2024, 05:13 PM IST
IND vs BAN : काळजावर दगड ठेऊन रोहितला घ्यावा लागणार 'हा' निर्णय, पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन title=

IND vs BAN Predicted Playing XI : भारत आणि बांगलादेश यांच्यात येत्या 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. पहिला सामना चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. त्यासाठी आता बीसीसीआयने टीम इंडियाच्या स्कॉडची देखील घोषणा केली, यामध्ये 16 खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन असेल. तर ऋषभ पंत आणि आकाश दीप यांचं कमबॅक झालंय. त्याबरोबर पहिल्यांदाच टीम इंडियाची जर्सी घालणाऱ्या यश दयालला डेब्यूची संधी मिळेल का? असा सवाल देखील विचारला जातोय.

रोहित शर्मा कोणता निर्णय घेणार?

जाहीर झालेल्या स्कॉडमध्ये दोन्ही युवा सलामीवीर फलंदाजांना संधी देण्यात आलीये. यामध्ये यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांची नावं आहेत. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल या दोघांना देखील संधी मिळेल, अशी शक्यता आहे. आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या दृष्टीकोणातून दोन्ही युवा सलामीवीर तयार करण्याची किमया गंभीरला करावी लागणार आहे. तर भारताचा स्टार विराट कोहली देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल. एवढंच नाही तर सरफराज खान आणि केएल राहुल यांमधील एकाला निवडण्याची कसोटी रोहित शर्माची असेल.

भविष्यातील सामन्यांचा आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा विचार करून रोहित शर्मा आपला हुकमी एक्का ऋषभ पंतला संघाबाहेर करण्याच्या मनस्थितीत नसेल. स्पिनर्सच्या डिपार्टेमेंटमध्ये आर अश्विन आणि रविंद्र जडेजा यांना चेन्नईच्या पीचचा अंदाज असल्याने संघात ठेवावं लागेल. तर युवा गोलंदाज आकाश दीप आणि डेब्यू मॅन यश दयाल यांना साथ देण्यासाठी जसप्रीत बुमराह तयार असणार आहे.

बांगलादेशविरुद्ध संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा (C), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, सरफराज खान, ऋषभ पंत (WK), आर अश्विन, आर जडेजा, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाचा स्कॉड - रोहित शर्मा (C), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (WK), ध्रुव जुरेल (WK), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

बांगलादेश संघाच्या दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक

बांगलादेश संघाचा भारत दौरा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. 19 तारखेला पहिली कसोटी चेन्नईत खेळवली जाणार आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबर रोजी कानपूरमध्ये खेळवला जाईल. त्यानंतर 6 ऑक्टोबरला ग्वाल्हेरमध्ये 3 सामन्यांची टी-20 मालिका सुरू होईल. दुसरा टी-20 सामना 9 ऑक्टोबरला दिल्लीत, तर तिसरा सामना 12 ऑक्टोबरला हैदराबाद च्या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.