IND vs AUS : दिल्ली टेस्टमध्ये Rohit Sharma 'या' खेळाडूंना घेऊन उतरणार मैदानात, पाहा कसं असेल प्लेईंग 11

दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार आहे, यावर सर्वांचं लक्ष्य असणार आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये श्रेयर अय्यरला संधी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 

Updated: Feb 16, 2023, 10:02 PM IST
IND vs AUS : दिल्ली टेस्टमध्ये Rohit Sharma 'या' खेळाडूंना घेऊन उतरणार मैदानात, पाहा कसं असेल प्लेईंग 11 title=

India vs Australia 2nd Test:  भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यामध्ये शुक्रवारी म्हणजेच 17 फेब्रुवारी रोजी दुसरा टेस्ट सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये टीम इंडियाने एक डाव आणि 132 रन्सने ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला. त्यानंतर आता शुक्रवारी अरूण जेटली मैदानात दुसरी टेस्ट मॅच रंगणार आहे. दुसऱ्या सामन्यातही ऑस्ट्रेलिया टीमला नमवण्याचा प्रयत्न रोहित ब्रिगेड करणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार आहे, यावर एक नजर टाकूया.

श्रेयस अय्यरला मिळणार संधी?

दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार आहे, यावर सर्वांचं लक्ष्य असणार आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये श्रेयर अय्यरला संधी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जर दुसऱ्या टेस्ट सामन्यात श्रेयस अय्यर खेळणार असेल तर सूर्यकुमार यादवला टीमबाहेर बसावं लागू शकतं. 

सूर्यकुमारने नागपूर टेस्टमध्ये केलं होतं. मात्र या सामन्यात त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. केवळ 8 रन्स करून पव्हेलियनमध्ये परतला होता.

के. एला राहुलला करावा लागणार चांगला खेळ

पहिल्या टेस्ट सामन्यात के.एल राहुल आणि केएस भरत या दोघांनाही चांगली कामगिरी करता आली नव्हती. राहुलने 71 बॉल्समध्ये 20 रन्स केले होते. तर डेब्यू करणारा विकेटकीपर केएस भरतने केवळ 8 रन्स केले होते. त्यामुळे दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये या दोघांना चांगली कामगिरी करावी लागेल. 

अरुण जेटली स्टेडियमवरही टर्निंग पीच असल्याने टीम इंडियाला दुसऱ्या टेस्ट सामन्यात गोलंदाजीचं संयोजन कायम ठेवावं लागणार आहे. अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या स्पिनरवर भारताची मदार असणार आहे. यासोबतच मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांनाही टीममध्ये संधी मिळणार आहे. 

दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर),  रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.