India vs Afghanistan T20 Series Schedule: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 11 जानेवारीपासून T20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने खेळले जाणार आहेत. या मालिकेतील अफगाणिस्तान टीमने पाच दिवस आधीच आपला संघ जाहिर केला.मात्र, टीम इंडियाची अद्याप घोषणा झालेली नाही. अफगाणिस्तानचा संघ प्रथमच टी-20 मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येत आहे. दरम्यान यंदा खेळल्या जाणाऱ्या टी 20 विश्वचषकाचा विचार करता ही मालिका दोन्ही संघासाठी महत्त्वाची असणार आहे.
अफगाणिस्तानचा नियमित T20I कर्णधार राशिद खानचा भारताविरुद्धच्या मालिकेसाठी यादीत समावेश करण्यात आला आहे. मात्र तिन्ही मालिकेतील सामन्यांमध्ये तो खेळताना दिसणार नाही. कारण पाठीच्या शस्त्रक्रियेतून तो नुकताच बरा झाला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने माहिती दिली की, भारताविरुद्ध अफगाणिस्तानचे नेतृत्व इब्राहिम झद्रान करणार आहे. तर मुजीब उर रहमानचा पुनरगामन झाला आहे.
दरम्यान, अफगाणिस्तान मालिकेला टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्या मुकणार आहे. त्यामुळे भारतीय टी 20 संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवले जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येते. रोहित आणि विराट कोहली 2022 च्या टी 20 वर्ल्डकपनंतर एकही आंतरराष्ट्रीय टी 20 सामना खेळलेला नाही. तसेच रोहित शर्मा टी 20 वर्ल्डकपमध्ये देखील टीम इंडियाचे नेतृत्व करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. याचबरोबर विराट कोहलीचा मात्र टी 20 वर्ल्डकपसाठी विचार केला जाणार नसल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र याबाबतची अजून अधिकृत माहिती बीसीसीआयने दिली नाही.
इब्राहिम झदरन (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमतुल्ला ओमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजलहक फारूकी, फरीद अहमद, नवीन -उल-हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब, राशिद खान.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान, 11 जानेवारी 2024, संध्याकाळी 7 वाजता
भारत विरुद्ध अफगाणिस्तान, 14 जानेवारी 2024, संध्याकाळी 7 वाजता
भारत विरुद्ध अफगाणिस्तान, 17 जानेवारी 2024, संध्याकाळी 7 वाजता