T20 World कपसाठी भारताची प्लेईंग 11 अशी असेल, कोच राहुल द्रविडनं केला खुलासा

सध्या जर तरच वातावरण असताना भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडनं (Coach Rahul Dravid) टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन कशी असेल, याबाबत खुलासा केला आहे.

Updated: Oct 2, 2022, 12:50 PM IST
T20 World कपसाठी भारताची प्लेईंग 11 अशी असेल,  कोच राहुल द्रविडनं केला खुलासा  title=

T20 World Cup 2022 Rahul Dravid: टी 20 वर्ल्डकप सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. त्यात जसप्रीत बुमराह संघात असणार की नाही? याबाबत संभ्रम आहे. भारतीय संघाची दीपक हुड्डा आणि जसप्रीत बुमराहच्या फिटनेसकडे लक्ष लागून आहे. सध्या जर तरच वातावरण असताना भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडनं (Coach Rahul Dravid) टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन कशी असेल, याबाबत खुलासा केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यापूर्वी द्रविडने पत्रकार परिषदेत हा खुलासा केला आहे. 

टी 20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) भारताचा पहिलाचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत आहे. भारत पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबरला पहिला सामना रंगणार आहे. '15 खेळाडूंमध्ये कोणत्या प्रकारचे कौशल्य हवे आहे याबद्दल आम्ही अगदी स्पष्ट आहोत. मला वाटते की विश्वचषकासाठी आम्ही कोणत्या प्रकारचा संघ निवडला. दुखापत वगळता, आम्ही कोणत्या प्रकारची कौशल्ये शोधत होतो, विविध प्रकारचे गोलंदाज, काही फलंदाजी कौशल्ये- त्यामुळे याबद्दल जास्त तपशीलात न जाता त्या सर्व गोष्टींबद्दल आम्ही नेहमीच स्पष्ट आहोत.', असं प्रशिक्षक राहुल द्रविड याने सांगितलं.

टी 20 वर्ल्डकपसाठी Jasprit Bumrah टीम इंडियासोबतच असणार! बीसीसीआय अधिकाऱ्यानं सांगितलं...

 

राहुल द्रविड म्हणाला की, "आगामी विश्वचषकात आमचा प्लेइंग 11 कसा असेल याबाबत आमची माईंडसेट स्पष्ट आहे. खूप आधीच 11 निवड करणं योग्य नाही. ऑस्ट्रेलियामध्ये आम्ही पाच वेगवेगळ्या स्टेडियममध्ये सामने खेळू. त्यामुळे संघात विविध प्रकारचे खेळाडू असणे महत्त्वाचे आहे. आम्हाला विरोधी संघांच्या रणनितीनुसार प्लेइंग 11 मध्ये बदल करावा लागेल."