IND vs WI | दुसऱ्या वन डे सामन्यात रविंद्र जडेजा खेळणार की नाही?

टीम इंडिया आज वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा वन डे सामना खेळणार आहे. पहिला वन डे सामना अवघ्या 3 धावांनी जिंकल्यानंतर दुसऱ्या वन डे सामन्याकडे लक्ष आहे. तर पराभवाचा वचपा काढण्यासाठी वेस्ट इंडिज सज्ज आहे.

Updated: Jul 24, 2022, 04:49 PM IST
IND vs WI | दुसऱ्या वन डे सामन्यात रविंद्र जडेजा खेळणार की नाही? title=

मुंबई : टीम इंडिया आज वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा वन डे सामना खेळणार आहे. पहिला वन डे सामना अवघ्या 3 धावांनी जिंकल्यानंतर दुसऱ्या वन डे सामन्याकडे लक्ष आहे. तर पराभवाचा वचपा काढण्यासाठी वेस्ट इंडिज सज्ज आहे.

दुसऱ्य़ा सामन्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. रविंद्र जडेजा दुसरा वन डे सामना खेळणार नसल्याची चर्चा आहे. रविंद्र जडेजाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो दुसऱ्या सामन्यातूनही बाहेर जाण्याची शक्यता आहे. 

वेस्ट इंडिज विरुद्ध आज दुसरा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. टीम इंडिया या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता रविंद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेल किंवा शार्दूल ठाकूरला खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. 

वेस्ट इंडिज संघाने नुकतीच घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 0-3 ने गमावली. यानंतर टीम इंडियाला पहिल्या वनडेतही पराभवाला सामोरे जावे लागले. 

वेस्ट इंडिज टीममध्ये स्टार ऑलराऊंडर खेळाडू जेसन होल्डर कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे टीमचं टेन्शन वाढलं आहे. त्यामुळे जेसन दुसरा सामनाही खेळू शकणार नाही. होल्डरला पहिल्या सामन्यातही खेळता आले नाही.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन : शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज.