मुंबई : टीम इंडियाचे खेळाडू पंड्या ब्रदर्सच्या कुटुंबियांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पंड्या कुटुंबियांच्या घरात पाळणा हलला आहे. त्यांच्या या घरी एका चिमुकल्या पावलांचे आगमण झाले आहे. या संदर्भात खेळाडूनेच सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.
टीम इंडियाचा बॅटसमन कृणाल पंड्या बाबा बनला आहे.कृणालची बायको पंखुरी शर्माने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. या संदर्भात त्याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत माहिती दिली आहे. तसेच या चिमुकल्याचे नावही जाहीर केला आहे. यामुळे टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पंड्या काका बनला आहे.
फोटोत काय?
कृणाल पंड्याने बायकोसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत दोघेही बाळाता हातावर घेऊन आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या या मुलाचे नाव कवीर कृणाल पंड्या ठेवले आहे. दरम्यान कृणालच्या या घोषणेनंतर आता क्रिकेट विश्वातून त्याला शुभेच्छा देण्यात येत आहे.