IND vs WI : दुसऱ्या टेस्टसाठी टीममध्ये मोठे बदल...; प्लेईंग 11 बाबत कर्णधार रोहितचा मोठा खुलासा

IND vs WI 2nd Test : भारत आणि वेस्ट इंडिज ( IND vs WI ) यांच्यातील दुसरा टेस्ट सामना ( IND vs WI 2nd Test ) आज खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार यावर एक नजर टाकूया.

सुरभि जगदीश | Updated: Jul 20, 2023, 10:17 AM IST
IND vs WI : दुसऱ्या टेस्टसाठी टीममध्ये मोठे बदल...; प्लेईंग 11 बाबत कर्णधार रोहितचा मोठा खुलासा  title=

IND vs WI 2nd Test : भारत आणि वेस्ट इंडिज ( IND vs WI ) यांच्यातील दुसरा टेस्ट सामना ( IND vs WI 2nd Test ) आज खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7.30 पासून या सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिला सामना तिसऱ्या दिवशी जिंकल्यानंतर दुसरी टेस्ट जिंकून सिरीज जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न टीम इंडिया ( Team India ) करणार आहे. दरम्यान दुसरा टेस्ट सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार यावर एक नजर टाकूया. 

दुसऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) म्हणाला, पहिली टेस्ट सामना जिंकणाऱ्या टीममध्ये कोणतेही मोठे बदल होणार नाहीत. मंगळवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रोहितने ही बाब स्पष्ट केली. रोहितच्या सांगण्यानुसार, आम्ही डॉमिनिकातील खेळपट्टी आणि स्थिती पाहिली होती, तेव्हा आम्ही त्यानुसार लक्ष दिले होते.

रोहित पुढे म्हणाला की, आम्ही कोणतेही मोठे बदल करू असे मला वाटत नाही. परिस्थिती कशीही असली तरी त्याआधारेच निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आजपासून सुरु होणाऱ्या सामन्यासाठी कोणताही बदल होणार नसल्याची शक्यता आहे.

हा सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 100 वा टेस्ट सामना असणार आहे. दोघांमध्ये आतापर्यंत 99 टेस्ट सामने खेळले गेलेत. याबाबत रोहित ( Rohit Sharma ) म्हणाला की, या सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व करणं ही सन्मानाची गोष्ट आहे. यामध्ये दोन्ही टीम्सचा इतका मोठा इतिहास असून आम्ही खूप चांगले क्रिकेट खेळलोय. 

टीम इंडियामधील तरूण मुलं चांगली कामगिरी करताना दिसतायत. या गोष्टीचा मला प्रचंड आनंद आहे. आता त्यांना टीमसाठी कशी तयारी करायची आणि कशी कामगिरी करायची हे त्यांच्यावर अवलंबून असल्याचंही रोहितने ( Rohit Sharma ) म्हटलंय.

दोन्ही टीमची संभाव्य प्लेईंग 11

टीम इंडिया प्लेइंग XI : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमान गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविंद्र जाडेजा, ईशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज

वेस्ट इंडिज प्लेईंग XI : क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), तेजनारायण चंद्रपॉल, एलिक अथानाज, जर्मेन ब्लॅकवुड, किर्क मॅकेंजी, जोशुआ डीसिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, केविन सिंक्लेयर, अल्जारी जोसफ, केमार रोच, शेनॉन ग्रैब्रियल