यॉर्कर किंगलाच मिळेना टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी?

ज्या वेगाने यॉर्कर टाकायचा त्यापेक्षा दुप्पट वेगाने हा स्टार बॉलर टीमबाहेर फेकला गेला 

Updated: Jan 30, 2022, 11:02 PM IST
यॉर्कर किंगलाच मिळेना टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी? title=

मुंबई : टीम इंडियामधील अनेक चांगली खेळाडू काळाच्या किंवा कर्णधार असो किंवा निवड समितीच्या मतभेदामुळे मागेच राहिली. बऱ्याच खेळाडूंना जेवढ्या लवकर संधी मिळाली तेवढ्याच वेगात बाहेरही फेकले गेले. काहीवेळा संधी न दिल्याने तर काहीवेळा दुर्लक्षित राहिल्याने असेल पण करियर धोक्यात आलं.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया 6 फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिजविरुद्ध 3 सामन्यांच्या वन डे आणि टी-20 सीरिज खेळणार आहे. या सीरिजमध्ये अनेक खेळाडूंना संघात खेळण्याची संधी देण्यात आली. असा गोलंदाज आहे जो या संधीच्या प्रतीक्षेत आहे मात्र संधी मिळत नाही. जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगासारखे धोकादायक यॉर्कर फेकण्याची कला या गोलंदाजाकडे आहे.

हा क्रिकेटपटू दुसरा तिसरा कोणी नसून टी नटराजन आहे. नटराजनला ना न्यूझीलंड, ना दक्षिण आफ्रिका, ना आता वेस्ट इंडिज मालिकेत संधी देण्यात आली आहे. बुमराहनंतर नटराजन हा दुसरा भारतीय गोलंदाज आहे जो यॉर्कर किंग मानला जातो. पण हा गोलंदाज त्याच्या दुखापत आणि फिटनेसमुळे इतका अस्वस्थ आहे की टीम इंडियाला आता आयपीएलच्या संघातही खेळण्याची संधी मिळत नाही. नटराजनला त्याच्या आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादनेही मेगा लिलावापूर्वी वगळले होते.

 2021 मध्ये यॉर्कर किंग म्हणून प्रसिद्धी मिळवणाऱ्या नटराजनला मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये सध्या खेळण्याची संधी मिळाली नाही. डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर फेकण्याची कला याला अवगत आहे. मात्र तो गेल्या काही काळापासून संधीची वाट पाहात आहे. 

टी नटराजनच्या आयपीएलमध्ये  24 सामन्यांमध्ये20 विकेट घेतल्या आहेत. टी नटराजन सनरायझर्स हैदराबाद संघातून खेळत होता. पण दुखापतीमुळे त्याला बाहेर पडावं लागलं. तो 2017 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळला आहे. टी नटराजनने आतापर्यंत फक्त 4  टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्या सामन्यांमध्ये त्याने 7 विकेट घेतल्या आहेत. 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने सर्वोत्तम गोलंदाजी केली होती.