IND vs SL T20I Series | Ishan Kishan ला रुग्णालयातून डिस्चार्ज, तिसरी टी 20 खेळणार की नाही?

टीम इंडियाचा (Team India) स्टार ओपनर ईशान किशनला (Ishan Kishan Discharged ) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.  

Updated: Feb 27, 2022, 03:05 PM IST
IND vs SL T20I Series | Ishan Kishan ला रुग्णालयातून डिस्चार्ज, तिसरी टी 20 खेळणार की नाही? title=
छाया सौजन्य : ईशान किशन ट्विटर

मुंबई : टीम इंडियासाठी  (Team India) आणि क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. टीम इंडियाचा स्टार ओपनर ईशान किशनला (Ishan Kishan) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र यानंतरही ईशानवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात बॅटिंग करताना ईशानच्या डोक्यावर चेंडू आदळला होता. त्यामुळे ईशानला रुग्णालयात दाखल केलं होतं. (ind vs sl t20i series team india opener ishan kishan get discharged from hospital)

नक्की काय झालं होतं?

लहिरु कुमारा टीम इंडियाच्या इनिंगमधील चौथी ओव्हर टाकत होता. या ओव्हरमधील लहिरुने 146 प्रति किलोमीटरने टाकलेला दुसरा चेंडू (3.2 ओव्हर) ईशानच्या हेल्मेटवर जाऊन आदळला. त्यामुळे ईशान मैदानात पडला. मात्र तो खेळत राहिला. पण ईशान काही ओव्हरनंतर 16 धावा करुन माघारी परतला. 

यानंतर ईशानला आवश्यक त्या उपचारांसाठी कांगडामधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ईशानला आधी आयसीयूत ठेवण्यात आलं.  मात्र त्यानंतर त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं गेलं. या दरम्यान ईशानचा सीटी स्कॅन रिपोर्ट काढण्यात आला. 

मात्र अवघ्या काही तासामंध्येच ईशानला डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे यावरुन तरी किमान ईशानला फार दुखापत झाली नसल्याचा अंदाज लावला जात आहे.  

ईशानवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असणार आहे. या दुखापतीमुळे ईशान कदाचित तिसरी टी 20 मॅच खेळणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 

टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे. दरम्यान  तिसरा आणि अखेरचा टी 20 सामना हा आज 27 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.