मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात आज (27 फेब्रुवारी) तिसरा टी 20 सामना पार पडणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. स्टार ओपनर बॅट्समनला या तिसऱ्या सामन्याला मुकावं लागलं आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. वीरेंद्र सेहवागसारखा आक्रमक शैलीत फलंदाजी करणारा ईशान किशन तिसऱ्या टी 20 सामन्यात खेळणार नाही. (ind vs sl t 20i series team india opener batsman ishan kishan ruled out of 3rd t20i)
नक्की कारण काय?
ईशानला नुकतंच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याला पुरेसा आराम करता यावा, यासाठी त्याला तिसऱ्या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे.
ईशानला श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात बॅटिंग करताना ईशानच्या डोक्यावर चेंडू आदळला होता. त्यामुळे ईशानला रुग्णालयात दाखल केलं होतं.
या दरम्यान ईशानला आधी आयसीयूत ठेवण्यात आलं. मात्र त्यानंतर त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं गेलं. या दरम्यान ईशानचा सीटी स्कॅन रिपोर्ट काढण्यात आला. मात्र अवघ्या काही तासामंध्येच ईशानला डिस्चार्ज मिळाला.
सध्या ईशानवर वैदयकीय पथक लक्ष देऊन आहे. त्याला विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी त्याला तिसऱ्या सामन्याला मुकावं लागलं आहे. दरम्यान आता ईशानच्या जागी कोणाला संधी मिळणार, हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
टी 20 सीरिजसाठी सुधारित टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, रवींद्र जाडेजा, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान आणि मयंक अग्रवाल.
NEWS - Ishan Kishan ruled out of 3rd T20I.
More details here - https://t.co/QVWZ4CFCv5 @Paytm #INDvSL pic.twitter.com/CN1a2GVLQa
— BCCI (@BCCI) February 27, 2022