भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सिंगच्या आरोपात ICC कडून 7 वर्षांसाठी बंदी

स्टार खेळाडू पाठोपाठ आणखी एकावर 7 वर्षांसाठी आयसीसीकडून बंदी

Updated: Jul 5, 2021, 11:07 PM IST
भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सिंगच्या आरोपात ICC कडून 7 वर्षांसाठी बंदी title=

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICCने भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सिंगच्या आरोपात 7 वर्षांची बंदी लावली आहे. या बंदीमुळे आता श्रीलंका क्रिकेट बोर्डच्या अडचणी वाढल्या आहेत. एकीकडे भारत विरुद्ध श्रीलंका टी 20 आणि वन डे सीरिज तोंडावर आली असताना दुसरीकडे या निर्णयामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डला मोठा धक्का बसला आहे. 

श्रीलंकेचा माजी प्रदर्शन विश्लेषक सनथ जयसुंदरा यांच्यावर सोमवारी 7 वर्षांसाठी बंदी लावण्यात आली आहे. जयसुंदरा यांच्यावर भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सिंगचे आरोप लावण्यात आले होते. 11 मे 2019 पासून ही बंदी लागू आहे. जे अनिश्चित काळासाठी लावण्यात आलं होतं. मात्र सोमवारी ICCने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. जयसुंदरा यांच्यावर 7 वर्षांसाठी ही बंदी लावण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे. 

श्रीलंकेच्या स्टार खेळाडूवरही बंदी

श्रीलंकेचा फलंदाज भनुका राजपक्ष याच्यावर एक वर्षांची बंदी लावण्यात आली आहे. तसेच 3.71 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला. मात्र, त्याला दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याची कारवाई त्वरित प्रभावाने  बंदी घातली जाणार नाही. 

भनुका राजपक्ष याच्यावर लावण्यात आलेली बंदी येत्या काळात लागू होईल. त्यामुळे भानुका राजपक्षेला टीम इंडिया विरुद्धच्या मालिकेसाठी ट्रेनिंग स्कॅवडमध्ये स्थान देण्यात आलं आहे. परंतु प्रत्यक्षात टीम इंडिया विरुद्ध वन डे आणि टी 20 सीरिजसाठी मैदानात खेळण्यासाठी उतरणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.