मुंबई : कृणाल पंड्या भारतीय संघाबाहेर पडल्यानंतर संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. काल, दुसरा T -20 सुरु होण्याच्या आधी एक धक्कादायक बातमी आली. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू कृणाल पांड्या याची कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आली. त्यानंतर हा सामना दुसर्या दिवशी म्हणजेच आज खेळला जाईल. कृणाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याने आज संघात बरेच मोठे बदल दिसू शकतात. श्रीलंका (Sri Lanka) विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्याआधी टीम इंडियात (Team India) हे 11 खेळाडू असू शकतात.
संघातील अनेक खेळाडू आजच्या सामन्यात कृणाल पांड्या याची जागा घेण्यासाठी उत्सुक आहेत. कृणालच्या जागी नितीश राणा, कृष्णाप्पा गौतम आणि राहुल यामधील एकाही खेळाडूला आज संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. या तीन खेळाडूंमध्ये कृष्णाप्पा गौतम याला मोठी संधी आहे. गोलंदाजीत फिरकीसह कृष्णप्पाही वेगवान फलंदाजी करु शकतो. अशा परिस्थितीत त्याला आज संधी दिली जाऊ शकते.
प्रशिक्षक राहुल द्रविड आजच्या सामन्यात प्रथमच देवदत्त पडिक्कल याला संधी देऊ शकेल. पपडिक्कल शॉ याने यापूर्वीच आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या टीम आरसीबीसाठी चांगले प्रदर्शन केले आहे. एकदिवसीय मालिकेपासून आतापर्यंत त्याला संघात संधी देण्यात आलेली नाही, पण आज त्याला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.
इशान किशन आणि संजू सॅमसन दोघांनाही पुन्हा एकदा संघात 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळू शकते. दुसरीकडे, आज सूर्यकुमार यादव याच्या जागी मनीष पांडेला मधल्या फळीत सामील केले जाऊ शकते. त्याचबरोबर आजच्या सामन्यात पुन्हा एकदा सर्वांची नजर खराब फॉर्ममध्ये जाणाऱ्या हार्दिक पांड्यावर असेल.
शेवटच्या सामन्यात शानदार गोलंदाजी करणारा भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहरही या सामन्यात वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करणार आहेत. फिरकीमध्ये वरुण चक्रवर्ती आणि कृष्णप्पा गौतम यांच्यासह युजवेंद्र चहल यांना स्थान देण्यात येईल.
शिखर धवन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल , ईशान किशन (विकेटकिपर), संजू सॅमसन, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, कृष्णप्पा गौथम, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), वरुण चक्रवर्ती, दीपक चहर आणि युजवेंद्र चहल.