Rohit Sharma | विराटचं नाही, तर कॅप्टन रोहित शर्मा या खेळाडूचं सर्व काही ऐकतो

टीम इंडियामध्ये (Team India) असा एक खेळाडू आहे, ज्यावर रोहित शर्मा (Rohit Sharma) विराट कोहलीपेक्षा (Virat Kohli) अधिक विश्वास दाखवतोय. 

Updated: Mar 13, 2022, 08:55 PM IST
Rohit Sharma | विराटचं नाही, तर कॅप्टन रोहित शर्मा या खेळाडूचं सर्व काही ऐकतो title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : रोहित शर्माची (Rohit Sharma) टीम इंडियाच्या (Team India) तिन्ही फॉरमॅटमध्ये कॅप्टन म्हणून निवड करण्यात आली. तेव्हापासून टीम इंडियाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. रोहितने टीममध्ये ज्या युवा खेळाडूंना संधी दिली ते सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. रोहितला युवा खेळाडूंसह माजी कर्णधार विराट कोहलीचाही (Virat Kohli) पूर्ण पाठिंबा मिळत आहे. मात्र रोहित विराटऐवजी टीममधल्या दुसऱ्याच खेळाडूचं सर्वकाही ऐकतोय. (ind vs sl 2nd test match wicketkeepar rishabh pant convince to captain rohit sharma for drs)

रोहितला विराटच्या कर्णधारपदाच्या अनुभवाचा फायदा होत आहे. पण टीममध्ये असा एक खेळाडू आहे, ज्यावर रोहित विराटपेक्षा अधिक विश्वास दाखवतोय. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून रिषभ पंत (Rishabh Pant) आहे. विशेष म्हणजे पंतचं ऐकणं हे रोहितसाठी फायदेशीर ठरतंय. 

पंत बॅटिंगने धमाकेदार कामगिरी करतोयत. सोबतच तो विकेटीकीपिंग करताना स्टंपमागून धमाका करतोय. डीआआरएस घेण्याचासाठी रोहितकडे कधी तगादा लावायचा आणि कधी नाही, हे पंतला आता चांगलंच जमतंय.

कॅप्टन रोहितचा डीआरएस घेण्याचा निर्णय हा बहुतांश वेळा पंतचा असतो. विशेष म्हणजे पंतने जेव्हा जेव्हा डीआरएस घेण्यास सांगितलाय, तेव्हा तेव्हा फलंदाज हा आऊट झालेलाय. श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतच याची प्रचिती आली. 

त्याचं झालं असं की, श्रीलंकाच्या पहिल्या डावातील 12 वी ओव्हर ही मोहम्मद शमी टाकत होता. शमीने या ओव्हरदरम्यान टाकलेला एक चेंडू हा बॅट्समनच्या पॅडवर जाऊन लागला. 

शमीने एलबीडबल्यूसाठी अपील केली. मात्र ती अपील अंपायरने नाकारली. मग काय पंतने रोहितला डीआरएस घेण्यासाठी सांगितलं. रोहितनेही डीआरएस घेतला. अन् काय बॅट्समन आऊट होता आऊट. त्यामुळे पंतच्या हुशारीने टीम इंडियाला मोठी विकेट मिळवून दिली.