IND vs SL 2ND T20I | पाठुम निस्संकाची अर्धशतकी खेळी, टीम इंडियाला 184 धावांचे आव्हान

श्रीलंकेने टीम इंडियाला दुसऱ्या टी 20 सामन्यात (IND vs SL 2ND T20I) विजयसाठी 184 धावांचे आव्हान दिले आहे.   

Updated: Feb 26, 2022, 08:59 PM IST
IND vs SL 2ND T20I | पाठुम निस्संकाची अर्धशतकी खेळी, टीम इंडियाला 184 धावांचे आव्हान title=
छाया सौजन्य : आयसीसी

लखनऊ : श्रीलंकेने टीम इंडियाला दुसऱ्या टी 20 सामन्यात (IND vs SL 2ND T20I) विजयसाठी 184 धावांचे आव्हान दिले आहे. श्रीलंकेने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 183 धावा केल्या. श्रीलंकेकडून पाठुम निस्संकाने (pathum nissanka) सर्वाधिक 75 धावांची खेळी केली. तर कर्णधार दासून शनाकाने नाबाद 47 रन्स केल्या. (ind vs sl 2nd t 20i sri lanka set 184 runs target for team india win pathum nissanka scored 75 runs innings at dharamsala) 

तर दुसऱ्या  बाजूला टीम इंडियाच्या बॉलिंग टाकलेल्या पाचच्या पाच गोलंदाजांनी प्रत्येकी 1 विकेट घेतला. भुवनेश्वर कुमार, जस्प्रीत बुमराह, हर्षल पटेल, रवींद्र जाडेजा आणि युझवेंद्र चहलने या प्रत्येकांनी 1 विकेट घेतली.

दरम्यान हा दुसरा सामना दोन्ही संघांसाठी आणि मालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकत मालिका विजयाची संधी आहे. हा सामना जिंकल्यास टीम इंडियाचा सलग 11 वा टी 20 विजय ठरेल. तर दुसऱ्या बाजूला ही मॅच जिंकत मालिकेत बरोबरी साधण्याचा मानस पाहुण्या श्रीलंकेचा असणार आहे.

त्यामुळे आता टीम इंडिया विजयी घोडदौड कायम राखणार की श्रीलंका विजयश्री मिळवणार, हे काही मिनिटांमध्ये स्पष्ट होईल.  

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन :  रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, रवींद्र जाडेजा, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल. 

श्रीलंकेची सेना : पाठुम निसांका, कामिल मिश्रा, चरित असलंका, दनुष्का गुनाथिलका, दिनेश चंदीमल (विकेटकीपर), दासुन शनाका (कॅप्टन), चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, प्रवीण जयविक्रमा, बिनुरा फर्नांडो आणि लाहिरू कुमारा.