IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या सीजनची सुरुवात लवकरच होणार आहे. प्रेक्षकांमध्ये ही आयपीएलच्या या नव्या सीजनसाठी उत्सूकता आहे. कारण यंदा 10 संघ नवीन नियमांसह मैदानात उतरणार आहेत. बीसीसीआयने यंदा नवीन नियम तयार केले आहेत. ज्यामुळे स्पर्धा ही अधिक चुरशीची होणार आहे. आयपीएलमध्ये यंदा 10 संघ हे 2 वेगवेगळ्या ग्रुपमध्ये खेळणार आहेत. त्यासाठी आयपीएल शेड्य़ुल देखील आलं आहे. ( how 4 teams from same group will qualify in IPL 2022 )
आयपीएलमध्ये प्रत्येक संघ एकूण 14 लीग सामने खेळणार आहे. त्यावरुन त्यांचा पुढचा प्रवास ठरणार आहे.
आयपीएलच्या 15 व्या सीजनमध्ये A ग्रुपमध्ये मुंबई इंडियंस (Mumbai Indians), कोलकाता नाइटराइडर्स (KKR), राजस्थान रॉयल्स (RR), दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSJ) यांना जागा मिळाली आहे. तर ग्रुप-B मध्ये चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings), सनराइजर्स हैदराबाद (SRH), रॉयल चँलेंजर्स बंगळुरु (RCB), पंजाब किंग्स (PK) आणि गुजरात टाइटंस (GT) यांचा समावेश आहे.
दोन्ही ग्रुपमधून 2 संघच क्वालिफाय करतील असा नियम नसणार आहे. ज्यांचं रेटिंग सर्वाधिक असेल ते संघ पुढे जाणार आहेत. याचा अर्थ एकाच ग्रुपमधील 4 संघ देखील सेमीफायनलसाठी क्वालिफाय होऊ शकतात. त्यामुळे ज्याचे पॉईंट्स अधिक तो संघ पुढे जाणार आहे.
आयपीएल 2022 ची सुरुवात ही 26 मार्चपासून होत आहे. बीसीसीआय (BCCI) ने म्हटलं की, फायनल मॅच ही 29 मे रोजी मुंबईत खेळली जाणार आहे. लीग राऊंडचे 70 सामने हे महाराष्ट्रात होणार आहे. प्लेऑफचे सामने कुठे होणार अजून निश्चित झालेले नाही.