IND vs SL 1st T20I | ईशान किशनची तुफानी खेळी, श्रीलंकेला विजयासाठी 200 धावांचं आव्हान

टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 200 धावांचं तगडं (IND vs SL 1st T20I) आव्हान दिलं आहे.  

Updated: Feb 24, 2022, 08:53 PM IST
IND vs SL 1st T20I | ईशान किशनची तुफानी खेळी, श्रीलंकेला विजयासाठी 200 धावांचं आव्हान title=
छाया सौजन्य : बीसीसीआय

लखनऊ : टीम इंडियाने  श्रीलंकेला विजयासाठी 200 धावांचं तगडं (IND vs SL 1st T20I) आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 199 धावा केल्या. टीम इंडियाकडून ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांनी तुफानी खेळी केली. ईशानने 56 चेंडूत 10 चौकार आणि 3 खणखणीत सिक्सच्या मदतीने 89 धावांची जोरदार खेळी केली.  (ind vs sl 1st t20i team india set 200 runs target for win to west indies ishan kishan shreyas iyer and rohit sharma shines at lucknow)

तर दुसऱ्या बाजूला श्रेयस अय्यरने 28 बॉलमध्ये 5 फोर आणि 2 सिक्ससह नाबाद 57 धावा चोपल्या. तसेच कॅप्टन रोहित शर्माने 44 धावांची खेळी केली. दसून शनाका आणि लहिरु कुमारा या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतला.

दरम्यान, आता फलंदाजांनी त्यांची भूमिका पद्धतशीर पार पाडली आहे. आता संपूर्ण जबाबदारी गोलंदाजांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे सामन्याचा निकाल काय लागणार, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. 
   
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन :  रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, दीपक हुडा, वेंकटेश अय्यर, रवींद्र जाडेजा, हार्दिक पटेल, भुवनेश्वर कुमार, जस्प्रीत बुमराह आणि यूजवेंद्र चहल. 

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : पथुम निसानका, कामिल मिशारा, चरित असलंका, दिनेश चांदीमल (विकेटकीपर), जेनिथ लियानागे, दासुन शनाका (कॅप्टन), चमिका करुणारत्ने, जेफरी वेंडरसे, प्रवीण जयविक्रमा, दुशमंथा चमीरा आणि लाहिरु कुमारा.