Rohit Sharma | 'हिटमॅन' रोहित शर्माचा पराक्रम, या स्टार बॅट्समनला पछाडत वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma ) श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) ब्रेक केलाय. 

Updated: Feb 24, 2022, 08:32 PM IST
Rohit Sharma | 'हिटमॅन' रोहित शर्माचा पराक्रम, या स्टार बॅट्समनला पछाडत वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक  title=
छाया सौजन्य : बीसीसीआय

लखनऊ : टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma ) श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) ब्रेक केलाय. रोहित न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टीलला (Martin Guptill) पछाडत टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा बॅट्समन ठरला आहे. (ind vs sl 1st t20i team india captain rohit sharma break new zealand martin guptill most t20i runs world record at lucknow)

या सामन्याआधी रोहितला हा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी 37 धावांची गरज होती. श्रीलंका विरुद्धच्या या सामन्यात रोहितने 37 वी धाव घेताच हा कारनामा केला. यासह रोहितने मार्टिन गुप्टीलला मागे टाकत विश्व विक्रमाला गवसणी घातली.

रोहितला अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र त्याला या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. रोहित 44 धावा करुन तंबूत परतला. रोहितने या खेळीत 32 चेंडच्या मदतीने 2 फोर आणि 1 सिक्स लगावला. 

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन :  रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, दीपक हुडा, वेंकटेश अय्यर, रवींद्र जाडेजा, हार्दिक पटेल, भुवनेश्वर कुमार, जस्प्रीत बुमराह आणि यूजवेंद्र चहल. 

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : पथुम निसानका, कामिल मिशारा, चरित असलंका, दिनेश चांदीमल (विकेटकीपर), जेनिथ लियानागे, दासुन शनाका (कॅप्टन), चमिका करुणारत्ने, जेफरी वेंडरसे, प्रवीण जयविक्रमा, दुशमंथा चमीरा आणि लाहिरु कुमारा.