प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, नव्या वर्षात मिळालं गोंडस गिफ्ट

नव्या वर्षात क्रिकेटपटूला मिळालं खास गिफ्ट, घरी नव्या पाहुण्याचं जंगी स्वागत

Updated: Jan 7, 2022, 12:01 PM IST
प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, नव्या वर्षात मिळालं गोंडस गिफ्ट title=

मुंबई: नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच क्रिकेटपटूला एक गोड गिफ्ट मिळालं आहे. चिमुकली पावलं आता क्रिकेटपटूच्या घरात आली आहेत. या क्रिकेटपटूला मुलगी झाली आहे. त्याने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने ही माहिती दिली. 

दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर आणि धडाकेबाज फलंदाज क्विंटन डिकॉक बाबा झाला. त्याची पत्नी शाशा हिने गोंडस मुलीला जन्म दिला. क्विंटननं सोशल मीडियावर मुलीसोबतचा गोंडस फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

डिकॉकने आपली परी आणि पत्नीसोबतचा फोटोही शेअर केला. यासोबतच मुलीच्या नावाचाही खुलासा करण्यात आला आहे. त्यांनी मुलीचे नाव कियारा ठेवलं आहे.

डिकॉकने नुकताच कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेदरम्यान त्याने निवृत्तीची घोषणा केली होती. तो फक्त पहिलीच कसोटी खेळला होता. 

डिकॉकने इन्स्टाग्रामवर दोन वेगवेगळे फोटो शेअर केले आहेत. यासोबत त्याने आपल्या चिमुकल्या मुलीच्या नावाचाही खुलासा केला आहे. त्याच्या या पोस्टवर चाहते आणि क्रिकेटपटू सहकाऱ्यांनीही खूप कमेंट्स केल्या आहेत. काहींनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने त्यांचा पराभव केला. दुसरा कसोटी सामना दक्षिण आफ्रिका जिंकल्याने दोन्ही संघाने 1-1 अशी बरोबरी केली आहे. 11 ते 15 जानेवारी दरम्यान तिसरा कसोटी सामना होणार आहे. हा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Quinton De Kock (@qdk_12)