जितकं उडायचंय तितकं उडून घ्या; भर मैदानात बुमराहने कोणाला खडसावलं?

दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर असताना वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने विरूद्ध टीमला चांगलंच खडसावलं.

Updated: Jan 7, 2022, 11:37 AM IST
जितकं उडायचंय तितकं उडून घ्या; भर मैदानात बुमराहने कोणाला खडसावलं? title=

जोहान्सबर्ग : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा दुसरा टेस्ट सामना 7 विकेट्सने गमावला. दरम्यान दुसऱ्या टेस्ट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आणि भारताचे खेळाडू यांच्यात वातावरण तापलं असल्याचं दिसून आलं. जोहान्सबर्ग टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर असताना वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने विरूद्ध टीमला चांगलंच खडसावलं.

मुख्य म्हणजे स्टम्पच्या माईकजवळ येत बुमराहने खडसावलं असल्याने त्याचे शब्द रकॉर्ड झालं. बुमराह म्हणतो, "मी मुद्दाम स्टम्प माईकजवळ आलो आहे. आता बघूया...पुढचा सामना अजून बाकी आहे. जेवढं उडायचंय तेवढं उडून घ्या...अजून एक सामना बाकी आहे."

यानंतर मोहम्मद शमी देखील बुमराहच्या या कृत्यात सहभागी झाला. यावेळी शमी म्हणाला, भरपूर बाकी आहे ठाकूर!...यानंतर बुमराही गप्प बसला नाही. जे लोकं ऐकतायत त्यांनी ऐकून घ्या, असं बुमराह म्हणाला.

दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत 202 रन्स केले होते. तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 229 रन्स केले. यानंतर दुसऱ्य़ा डावात फलंदाजीला उतरत भारतीय टीमने 266 रन्स करत विजयासाठी दक्षिण आफ्रिकेला 240 चं टार्गेट दिलं.

यापूर्वी या मैदानावर दक्षिण आफ्रिकेने 240 रन्सच्या इतक्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला नव्हता. मात्र या सामन्यात केवळ 3 विकेट्स गमावत टीम इंडियावर विजय मिळवला. सध्या 3 टेस्ट सामन्यांच्या या कसोटीत 1-1 अशी बरोबरी झाल्याने तिसरी कसोटी निर्णायक असणार आहे.