IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा पाचवा T20 सामना रद्द होणार? 'हे' आहे कारण...

भारत-दक्षिण आफ्रिकेतील पाच T20 सामन्यातील पाचवा टी20 सामना आज एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. 

Updated: Jun 19, 2022, 02:53 PM IST
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा पाचवा T20 सामना रद्द होणार? 'हे' आहे कारण... title=

मुंबई : भारत-दक्षिण आफ्रिकेतील पाच T20 सामन्यातील पाचवा टी20 सामना आज एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. या मालिकेते आतापर्यंत दोन्ही संघाने 2-2ने आघाडी घेतली आहे. आजचा पाचवा सामना हा निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात विजय मिळवून कोणता संघ मालिका खिशात घालतो, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. 
 
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या सामन्यात पावसामुळे व्यत्यय येऊ शकतो. हवामान खात्यानुसार, कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये आज पावसाची शक्यता आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे रणजी ट्रॉफीच्या सामन्यांवरही परिणाम झाला होता. त्यामुळे आता पाचव्या टी20वरही पावसाचे सावट आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती, मात्र त्यानंतर टीम इंडियाने सलग दोन सामने जिंकून मालिकेत पुनरागमन केले. आता भारतीय संघाला मालिका जिंकण्याची चांगली संधी आहे, मात्र पावसामुळे ती धुळीस मिळण्याची शक्यता आहे. 

दरम्यान जर पाऊस पडला आणि थांबलाच नाही तर दोघांनाही संयुक्तपणे विजेता घोषित केले जाऊ शकते, कारण यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही.

भारत आघाडीवर 
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 19 टी-20 सामने खेळले गेले आहेत, ज्यापैकी टीम इंडियाने 11 जिंकले आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेला 8 सामने जिंकण्यात यश आले आहे. भारतीय संघ आजपर्यंत आफ्रिकन संघाविरुद्ध त्यांच्या घरी मालिका जिंकू शकलेला नाही. टीम इंडियाला मालिका जिंकण्याची चांगली संधी आहे.