Team India: हे आहे भारतीय संघातील कमनशिबी कर्णधार! एका सामन्यातच संपलं कॅप्टन्सी करिअर

टीम इंडियाच्या 4 कर्णधारांनी केवळ एका सामन्यात संघाची धुरा सांभाळली आहे.

Updated: Jun 19, 2022, 02:41 PM IST
Team India: हे आहे भारतीय संघातील कमनशिबी कर्णधार! एका सामन्यातच संपलं कॅप्टन्सी करिअर title=

Team India: टीम इंडियाचा क्रिकेट इतिहास खूप जुना आणि तितकाच अद्भुत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे आतापर्यंत 35  कर्णधार झाले आहेत. असे अनेक कसोटी कर्णधारांची कारकिर्द चांगली राहिली आहे. पण काही कर्णधार असे आहेत की, त्यांना संधी मिळाली पण त्यांचं कर्णधारपदाचं करिअर एका सामन्यातच संपुष्टात आलं. टीम इंडियाच्या 4 कर्णधारांनी केवळ एका सामन्यात संघाची धुरा सांभाळली.

रवी शास्त्री

टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. 11 जानेवारी 1988 रोजी चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यादरम्यान रवी शास्त्रीला संघाचे नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली होती. पण रवी शास्त्रींना केवळ एका कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. भारताने सामना जिंकला असला तरी त्यानंतर रवी शास्त्रींना पुन्हा कसोटीत कर्णधारपदाची संधी मिळाली नाही.

पंकज रॉय

भारतीय संघ 1959 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यावर पंकज रॉय यांना दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधारपदाची संधी मिळाली. पंकज रॉय देखील अशा कर्णधारांपैकी एक आहे ज्यांना केवळ एका कसोटी सामन्यात कर्णधारपदाची संधी मिळाली. या सामन्यात इंग्लंड संघाने भारताचा 8 गडी राखून पराभव केला. पंकज रॉय यांना भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद देण्याची ही पहिली आणि शेवटची वेळ होती.

चंदू बोर्डे

टीम इंडिया 1967-68 दरम्यान इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. या दौऱ्यात चंदू बोर्डे यांच्याकडे भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली. हा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला गेला होता. मन्सूर अली खान पतौडी यांच्या जागी चंदू बोर्डे यांना कर्णधार बनवण्यात आलं होतं. या सामन्यात टीम इंडियाला 146 धावांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यानंतर चंदू बोर्डे यांच्याकडे पुन्हा  कसोटी टीम इंडियाची कमान सोपवण्यात आली नाही.

हेमू अधिकारी

या यादीत हेमू अधिकारी यांच्या नावाचाही समावेश आहे. 1958-59 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत हेमू अधिकारी यांना भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. या मालिकेत भारताने 4 कर्णधार बदलले. या सामन्यानंतर हेमू अधिकारी यांना कसोटीत कर्णधारपदाची संधी मिळाली नाही.