IND vs SA 4th T20 : दिनेश कार्तिकची तुफानी खेळी, दक्षिण आफ्रिकेसमोर 170 धावांचे लक्ष्य

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 170 धावांचे आव्हान दिले आहे. 

Updated: Jun 17, 2022, 08:55 PM IST
IND vs SA 4th T20 : दिनेश कार्तिकची तुफानी खेळी, दक्षिण आफ्रिकेसमोर 170 धावांचे लक्ष्य  title=

मुंबई : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 170 धावांचे आव्हान दिले आहे. कार्तिकचे अर्धशतक आणि हार्दिक पंड्याच्या ४६ धावाच्या बळावर भारत 6 विकेट गमावून 169 धावा करू शकला. आता दक्षिण आफ्रिका या धावांचे आव्हान पूर्ण करून मालिका खिशात घालते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे भारत प्रथम फलंदाजीला उतरली होती. भारताची सुरुवात काहीशी चांगली झाली नाही. भारताला सुरुवातीला मोठे धक्के बसले. भारताचे सलामीवीर ईशान किशान आणि ऋतुराज गायकवाड डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरले होते. सलामीवीर ऋतुराज गायकवाड पाच धावा करून बाद झाला आहे. लुंगी एनगिडीने त्याला माघारी पाठवले. भारताचा स्फोटक फंलदाज श्रेयस अय्यर अवघ्या चार धावा करून बाद झाला. ईशान २७ धावा करून एनरिक नॉर्कियाच्या गोलंदाजीवर बाद झाला.हार्दिक पंड्याने तुफान ४६ धावाची खेळी केली.  स्फोटक भारतीय फलंदाज दिनेश कार्तिकने २६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या धावांच्या बळावर भारताने 169 धावापर्यंत मजल मारली. तर दक्षिण आफ्रिकेला 170 धावांचे आव्हान दिले आहे.  

तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकून पाहुण्या दक्षिण आफ्रिकन संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी आफ्रिकेचा संघ प्रयत्नशील असले. तर, आजचा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.