IND vs PAK : टीम इंडियाच्या पराभवावर भडकले चाहते, 'या' खेळाडूला बाहेर ठेवणं घोडचूक

सोशल मीडियामुळे मीम्सचा धुमाकूळ 

Updated: Oct 25, 2021, 07:17 AM IST
IND vs PAK : टीम इंडियाच्या पराभवावर भडकले चाहते, 'या' खेळाडूला बाहेर ठेवणं घोडचूक  title=

मुंबई : आयसीसी टी -20 विश्वचषक 2021 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याचा निकाल लागल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांचे मन दुखावले होते. विराट कोहलीच्या सैन्याकडून कोणाला 'ही' अपेक्षा नव्हती.

भारतीय संघाचे 151 धावा 

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 151 धावा केल्या. भारतासाठी कर्णधार विराट कोहलीने शानदार डाव खेळला आणि 49 चेंडूत 57 धावा पूर्ण केल्या, तर ऋषभ पंतने 30 चेंडूत 39 धावा केल्या.

भारताचा लाजिरवाणा पराभव

लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांचा घाम गाळला. मोहम्मद रिझवानने 55 चेंडूत 79 आणि बाबर आझमने 52 चेंडूत 68 धावा करत टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला.

संतप्त चाहते म्हणाले

शार्दुलला का बाहेर ठेवले' 'विराट आर्मी'च्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका व्यक्तीने लिहिले की पाकिस्तानने भारताला पराभूत केले नाही, परंतु अति आत्मविश्वासामुळे तो पराभूत झाला. या सामन्यात शार्दुल ठाकूरला संधी दिल्यास बाजी उलटू शकते, असे अनेकांचे मत आहे.

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्यात भारताचा पराभव झाला आहे. T20 World cup च्या भारताच्या पहिल्याच सामन्यात मोठं अपयश आलं आहे. टीम इंडियाच्या बोलर्सना पहिल्या 10 ओव्हर्समध्ये एकही विकेट घेण्यात यश मिळालं नाही. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली.