सुपर ओव्हरमधल्या विजयानंतरही टीम इंडियाला धक्का

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२०मध्येही भारताचा सुपर ओव्हरमध्ये विजय झाला. 

Updated: Feb 1, 2020, 07:57 PM IST
सुपर ओव्हरमधल्या विजयानंतरही टीम इंडियाला धक्का title=

वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२०मध्येही भारताचा सुपर ओव्हरमध्ये विजय झाला. याआधी तिसरी टी-२० मॅचही भारताने सुपर ओव्हरमध्येच जिंकली होती. ५ टी-२० मॅचच्या या सीरिजमध्ये भारताने ४-०ने आघाडी घेतली आहे. आता या सीरिजची शेवटची मॅच रविवारी खेळवण्यात येणार आहे. पण चौथ्या टी-२० मॅचनंतर टीम इंडियाला धक्का बसला आहे.

चौथ्या टी-२० मॅचमध्ये वेळेमध्ये निर्धारित ओव्हर पूर्ण न केल्यामुळे टीम इंडियाला ४० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. भारताने त्यांच्या निर्धारित वेळेत १ ओव्हर कमी टाकल्या. यामध्ये सुपर ओव्हरच्या वेळेचा समावेश करण्यात आलेला नाही. मॅच रेफ्री क्रीस ब्रॉड यांनी हा दंड ठोठावला आहे.

आयसीसीच्या आचारसंहिता अनुच्छेद २.२२ नुसार वेळेत ओव्हर पूर्ण न केल्यामुळे खेळाडूंना प्रत्येक ओव्हरचा हिशोब करुन २० टक्के दंड लागतो. भारताचा कर्णधार कोहलीने ही चूक स्वीकारली, त्यामुळे या प्रकरणाची औपचारिक सुनावणी झाली नाही. मैदानातले अंपायर क्रिस ब्राऊन, शॉन हेग आणि थर्ड अंपायर एश्ले मेहरोत्रा यांनी हे आरोप केले होते.