IND vs NZ 3rd T20: सामन्याआधीच मोठी बातमी; कर्णधारच संघाबाहेर, कारण वाचून धक्का बसेल

IND vs NZ T20 Live Updates: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा T20 सामना 22 नोव्हेंबर रोजी नेपियर येथे होणार आहे. या सामन्याआधीच मोठी माहिती समोर येत आहे. 

Updated: Nov 21, 2022, 12:02 PM IST
IND vs NZ 3rd T20: सामन्याआधीच मोठी बातमी; कर्णधारच संघाबाहेर, कारण वाचून धक्का बसेल  title=
IND vs NZ 3rd T20 series new ealand captain kane williamson will not playing

IND vs NZ T20 Live Updates: न्यूझीलंडमधील माऊंट मौनगानुई येथील बे ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाने (Team India) किवी संघाचा 35 धावांनी पराभव केला. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात 6 गडी गमावून 191 धावा केल्या. या सामन्यात सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) त्याच्या टी 20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. त्याने 51 चेंडूत 111 धावांची नाबाद खेळी खेळली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा (IND vs NZ ) डाव 126 धावांवर आटोपला. मात्र आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा T20 सामन्याआधीच (IND vs NZ 3rd T20) मोठी बातमी समोर येत आहे.    

भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जास्त काळ क्रीझवर राहू दिले नाही. पण न्यूझीलंडकडून एका खेळाडूने मात्र मैदानावर उभे ठाकत आपल्या संघासाठी अर्धशतक करत जास्तीत धावा केल्या. आता हाच खेळाडू तिसऱ्या सामन्यात संघाबाहेर जाणार आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) पूर्व-नियोजन केलेल्या वैद्यकीय भेटीमुळे नेपियर येथे भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी-20 सामन्यातून बाहेर पडला आहे. 

विल्यमसन नेपियर टी-20 खेळणार नाही

याबाबत न्यूझीलंड क्रिकेट (NZC) ने सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "ब्लॅककॅप्सचा कर्णधार केन विल्यमसन मंगळवारी नेपियरमध्ये पूर्व-नियोजन केलेल्या वैद्यकीय तपासणीकरिता जाणार असून तिसरा टी-20 सामना खेळू शकणार नाही. " ऑकलंड एसेसचा फलंदाज मार्क चॅपमन टी-20 संघात सामील होणार आहे. ऑकलंडमध्ये शुक्रवारी ईडन पार्कवर होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील सलामीच्या सामन्यापूर्वी विल्यमसन बुधवारी पुन्हा संघात सामील होईल.  

वाचा: न्यूझीलंडच्या 'या' खेळाडूने उत्कृष्ट गोलंदाजी करत घेतली  हॅट्रीक 

प्रशिक्षक गॅरी स्टीड (Coach Gary Steed) म्हणाले की, वैद्यकीय चेकअप विल्यमसनच्या कोपराच्या दुखापतीशी काहीही संबंध नाही. "केन काही काळापासून वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांची वेळ घेण्याचा प्रयत्न करत होता. परंतु दुर्दैवाने ते आमच्या वेळापत्रकात बसू शकले नाही. आमच्या खेळाडूंचे आणि स्टाफचे आरोग्य आम्हाला सर्वोपरी महत्त्वाचे आहे आणि तो ऑकलंडमध्ये संघात सामील होण्याची वाट पाहू." असे स्टड म्हणाले. 

भारत सध्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. पहिला सामना पावसामुळे खेळतात आला नाही. भारताने दुसऱ्या टी-20 मध्ये किवींचा 65 धावांनी पराभव केला. स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (51 चेंडूत 111*) आणि फलंदाजी करणारा अष्टपैलू दीपक हुडा (10 धावा देत 4 विकेट) हे सामन्याचे हिरो ठरले.