Video : रांचीत टीम इंडियाचं भव्य स्वागत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी

भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा दुसरा टी20 सामना शुक्रवारी रांचीत रंगणर आहे

Updated: Nov 18, 2021, 10:14 PM IST
Video : रांचीत टीम इंडियाचं भव्य स्वागत, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी title=

मुंबई : भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा (India vs New Zealand) दुसरा टी20 सामना शुक्रवारी रंगणर आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया (Team India) आज रांचीत (Ranchi) दाखल झाली. हा सामना जिंकून 3 सामन्यांची टी20 मालिका (T20 Series) जिंकण्याच्या उद्देशाने टीम इंडिया रांचीत पोहचली आहे. रांचीत क्रिकेट चाहत्यांनी (Cricket Fans) टीम इंडियात भव्य स्वागत केलं.

भारत आणि न्यूझीलंड संघाचे खेळाडू जयपुरहून विमानाने रांचीत दाखल झाले. भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर विमानातला व्यंकटेश अय्यरबरोबरचा (Vyankatesh Iyer) फोटो शेअर केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ashwin (@rashwin99)

तर ईशान किशनने (Ishan Kishan) आपल्या ट्विटर अकाऊंटवर यजुवेंद्र चहल बरोबरचा फोटा शेअर केला आहे. 

त्याच बरोबर बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाचे खेळाडू रांची विमानतळावरुन बाहेर पडतानाचा व्हिडिओ टाकला आहे. विमानतळापासून हॉटेलपर्यंतच्या संपूर्ण रस्त्यावर आपल्या आवडत्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी दुतर्फा गर्दी केली होती. या दृष्य काही खेळाडू आपल्या कॅमेरात कैद करत होते तर काही खेळाडू चाहत्यांना हात हलवून त्यांचं स्वागत स्विकारत होते. खेळाडू थांबलेल्या हॉटेलमध्येही खेळाडूंना पाहण्यासाठी गर्दी झाली होती.