शोधू मी कुठे कसा प्रिये तुला... LIVE मॅचमध्ये दीपक चाहर शोधतोय गर्लफ्रेंडला

LIVE मॅचमध्ये गर्लफ्रेंडला शोधताना दीपक चाहरची झाली अशी अवस्था... पाहा व्हिडीओ

Updated: Nov 18, 2021, 10:08 PM IST
शोधू मी कुठे कसा प्रिये तुला... LIVE मॅचमध्ये दीपक चाहर शोधतोय गर्लफ्रेंडला title=

जयपूर: न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरिजमध्ये टीम इंडियाने 5 विकेट्सने सामना जिंकला. यासोबत टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. या सामन्यात सूर्यकुमारने सर्वाधिक धावा केल्या. रोहित आणि राहुल द्रविडच्या पर्वाची विजयाने सुरुवात झाली. न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात एक मजेशीर प्रसंग घडला. 

दीपक चाहर पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये होता. रोहित शर्माने पहिल्यांदा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सामन्या दरम्यान दीपक चाहर आपल्या गर्लफ्रेंडला शोधत होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

या सामन्यात फिल्डिंग करताना दीपक चाहर जया भारद्वाजला शोधताना दिसला. दीपकच्या बहिणीनं याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. दीपकने IPL दरम्यान आपल्या गर्लफ्रेंडला मैदानात सामना झाल्यानंतर प्रपोज केलं होतं. 

या दोघांच्या मैदानातील प्रपोजची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती. स्टेडियममधील प्रपोजचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दीपक आपल्या बहिणीला विचारताना दिसत आहे. ती कुठे आहे असा प्रश्न बाऊन्ड्री फिल्डिंग दरम्यान दीपकने केला. 

टी 20 सीरिजमधील पहिल्या सामन्यात व्यंकटेश अय्यरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केलं. न्यूझीलंड संघाने दिलेलं 165 धावांचं टार्गेट टीम इंडियाने पूर्ण केलं. सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा यांनी टीममध्ये सर्वाधिक धावा केल्या.