Sarfaraz Khan ने ठोकलं टेस्टमधील पहिलं शतक, रोहित-कोहलीने केला जल्लोष, ड्रेसिंग रूममधील Video समोर

Sarfaraz Khan Century : टीम इंडियाचा युवा खेळाडू सरफराज खान याने टेस्ट क्रिकेटमध्ये त्याचे पहिले  शतक ठोकले. या शतकानंतर रोहित - कोहली सह टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष केला. 

पुजा पवार | Updated: Oct 19, 2024, 12:22 PM IST
Sarfaraz Khan ने ठोकलं टेस्टमधील पहिलं शतक, रोहित-कोहलीने केला जल्लोष, ड्रेसिंग रूममधील Video समोर  title=
(Photo Credit : Social Media)

IND VS NZ 1st Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन समान्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. 16 ऑक्टोबरपासून बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर पहिल्या टेस्ट सामन्याला सुरुवात झाली असून शनिवारी या सामन्याचा चौथा दिवस आहे. यात टीम इंडियाचा युवा खेळाडू सरफराज खान याने टेस्ट क्रिकेटमध्ये त्याचे पहिले  शतक ठोकले. या शतकानंतर रोहित - कोहली सह टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष केला. 

सरफराज खानचं दमदार शतक : 

बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दमदार खेळी करून 402 धावा केल्या आणि 356 धावांची आघाडी घेतली होती. फलंदाजी करताना भारताने 3 विकेट्स गमावून 231 धावा केल्या तसेच दिवसाअंती न्यूझीलंड 125 धावांच्या आघाडीवर होती. तिसऱ्या दिवशी सरफराज खानने देखील 7 चौकार आणि 3 षटकारांच्या जोरावर नाबाद 70 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी देखील सरफराज खानने हाच फॉर्म कायम ठेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आणि टेस्ट क्रिकेटमधील पहिलं शतक ठोकलं. सरफराज खानच्या या शतकानंतर ड्रेसिंग रूममध्ये रोहित- विराट आणि इतर खेळाडूंनी जल्लोष केला. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

हेही वाचा : Video : रोहित शर्माचं बॅड लक! विचारही केला नसेल अशी विकेट पडली, रडवेल्या चेहऱ्यानं मैदानाबाहेर पडला

 

पाहा व्हिडीओ : 

भारताची प्लेईंग 11 :

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

न्यूझीलंडची प्लेईंग 11 :

टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टिम साउथी, एजाझ पटेल, विल्यम ओरूरके