IND vs ENG T20 : टीम इंडियाची टॉप ऑर्डर फेल, 4 ओव्हरमध्ये 3 विकेट

पहिल्या टी-20 सामन्यामध्ये 3 मोठे खेळाडू स्वस्तात माघारी

Updated: Mar 12, 2021, 07:55 PM IST
IND vs ENG  T20 : टीम इंडियाची टॉप ऑर्डर फेल, 4 ओव्हरमध्ये 3 विकेट title=
Photo credit- BCCI/ICC

अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी -२० सीरीजचा पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने 4 ओव्हरमध्ये 3 विकेट गमवत 20 रन केले आहेत.

पहिल्या टी -२० सामन्यात केएल राहुल आणि शिखर धवन यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. दुसर्‍या ओव्हरमध्येच भारतीय संघाला पहिला धक्का बसला. केएल राहुलला जोफ्रा आर्चरने 1 रनवर आऊट केले. भारताचा कर्णधार विराट कोहलीला शून्यावर बाद करत आदिल राशिदने मोठा धक्का दिला. मार्क वूडने शिखर धवनला 4 धावांवर बाद केले आणि भारतीय संघाला तिसरा धक्का दिला.

पहिल्यास सामन्यात आज भारताची टॉप ऑर्डर फेल ठरली आहे. सध्या बातमी लिहिपर्यंत ऋषभ पंत 19 तर श्रेयस अय्यर 15 रनवर खेळत आहे. 9 ओव्हरमध्ये भारताने 40 रन केले आहेत. मीडल ऑर्डरवर आता विकेट टिकवून ठेवण्यासह धावसंख्या उभारण्याचं देखील मोठं आव्हान असणार आहे.

आतापर्यंत टी-20 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात कांटे की टक्कर झाली आहे. दोन्ही संघामध्ये झालेल्या 14 टी20 इंटरनेशनल सामन्यांमध्ये दोन्ही संघाने 7-7 सामने जिंकले आहेत. इंग्लंडने आतापर्यंत 126 टी20 सामने खेळले आहेत. ज्यापैकी 64 सामने जिंकले असून 55 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना केला आहे. भारतीय संघाने 137 सामन्यांमध्ये 85 सामने जिंकले असून 45 सामन्यात पराभवाचा सामना केला आहे.

भारतीय टीम

केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, isषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल.

इंग्लंड टीम

जेसन रॉय, जोस बटलर (यष्टीरक्षक), डेव्हिड मालन, जॉनी बेअरस्टो, इयन मॉर्गन (कर्णधार), बेन स्टोक्स, सॅम कुर्रान, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद, मार्क वुड