नॉटिंघम: इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. 4 ऑगस्टपासून पहिला कसोटी सामना सुरू झाला आहे. पहिल्याच कसोटी सामन्यात दोन दिवस पावसाचा व्यत्यय आला. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. क्रिकेटच्या मैदानात बऱ्याचदा वाद होत असतात. पहिल्या सामन्यात देखील वाद झाला मात्र टीम इंडियाच्या खेळाडूला स्लेज केल्यानंतर त्यानेही तोडीस तोड उत्तर इंग्लंडच्या खेळाडूला दिलं आहे.
पहिल्या डावात टीम इंडियाने इंग्लंडवर 90 धावांची आघाडी घेतली. त्याचवेळी इंग्लंडच्या दुसऱ्या डावात बॉलिंग करताना मोहम्मद सिराज खूप आक्रमक दिसत होता. एकदा नाही तर दोनदा तो इंग्लंडच्या खेळाडूंसोबत वाद घालताना दिसला. खरं तर, सिराज इंग्लंडचा सलामीवीर डोमिनिक सिबलीशी वाद घालताना दिसला. सिबलीने सिराजला चौकार मारताच सिराजला राग आला आणि तो फलंदाजाला स्लेजिंग करताना दिसला. सिराज सतत डोमिनिक सिबलीला चिथवण्याचा प्रयत्न करत होता.
दुसऱ्यांदा सिराज जेम्सशी भिडताना दिसला. जेम्स अँडरसन टीम इंडियाची शेवटची विकेट काढण्यात अपयशी ठरू लागला, जेव्हा तो निराश झाला आणि मोहम्मद सिराजला त्याने स्लेज करण्याचा प्रयत्न केला. सिराजला त्याचे शब्द आवडले नाहीत आणि मग त्याने जिमीला उत्तर दिले.
Mohammed Siraj sledging Jimmy Anderson #ENGvsIND #Anderson #KLRahul pic.twitter.com/YlnVLPyPxP
— Ashwani Pratap Singh (@Ashwani45singh) August 6, 2021
#IndvsEng #ENGvsIND pic.twitter.com/PwNNNDa5DL
— Prabhat Sharma (@PrabS619) August 7, 2021
हे प्रकरण तिथल्या तिथे शांत झालं असलं तरी त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली कसोटी सुरू आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होताच वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने भारताला शानदार सुरुवात करून दिली. सिराजने इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्सला 18 धावांच्या धावांवर बाद केलं.