विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्यावर गंभीर आरोप

इंग्लंड विरुद्ध भारत चेन्नई कसोटी सामन्यात कुलदीप यादवला संधी न दिल्यानं भारतीय संघातील नियोजनावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

Updated: Feb 11, 2021, 01:55 PM IST
विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्यावर गंभीर आरोप title=

चेन्नई: भारत विरुद्ध इंग्लंड 4 सामन्यांची मालिका सुरू आहे. त्यापैकी पहिल्या सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला. या पराभवाचं खापर अनेकांनी कर्णधार विराट कोहलीवर फोडलं आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराटनं संघात काही बदल केल्यामुळे आपण सामना गमावल्याची टीका होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सौरव गांगूली यांच्यापासून अनेकांनी टीका केली. 

इंग्लंड विरुद्ध भारत चेन्नई कसोटी सामन्यात कुलदीप यादवला संधी न दिल्यानं भारतीय संघातील नियोजनावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. कुलदीपला प्लेइंग इलेवनमध्ये खेळू न दिल्यानं कर्णधार विराट कोहलीवर टीकाही झाली. 

कुलदीप यादवने अखेरचा कसोटी सामना 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध (सिडनी) सिडनी येथे खेळला होता. त्या सामन्यात कुलदीप यादवने डावात 5 विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवचं बालपणीचे प्रशिक्षक कपील पांडे यांनी 'स्पोर्टस्केडा'ला दिलेल्या मुलाखतीत भारतीय संघाच्या एकूणच व्यवस्थापनावर टीकेची झोट उठवली.

कपील पांडे यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावरही टीका केली आहे. कुलदीप यादवला कसोटी सामन्यांमध्ये खेळण्याची जाणीवपूर्वक संधी दिली नाही. नाहीतर आतापर्यंत कसोटी सामन्यात 200 विकेट्स कुलदीपने स्वत:च्या नावावर केल्या असत्या असा दावाही केला आहे. 

कपिल पांडे यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांना कुलदीप यादव यांना न निवडण्याचे कारण विचारले आहे. या 'चायनामन' गोलंदाजाचे प्रशिक्षक म्हणाले, कुलदीप यादवर अन्याय केला जात आहे. कर्णधार आणि प्रशिक्षकाची महानता कुठे आहे? असा खोचक सवालही उपस्थित केला आहे.