मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सीरिजमधील पहिला सामना आज खेळला जात आहे. चेन्नईतील चेपम मैदानात हा सामना सुरू आहे. इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून पहिला फलंदाजीचा निर्णय घेतला. तर भारतीय संघाच्या वाट्याला पहिल्यांदा गोलंदाजी आली. भारतीय संघातील गोलंदाजांनी आपल्या भेदक माऱ्यानं इंग्लंडच्या संघाला धक्का दिला. जवळपास 20 ओव्हर होईपर्यंत त्यांना जमतेम रन काढण्यात यश मिळालं.
कर्णधार विराट कोहलीनं या कसोटी सामन्यातील पहिल्या सामन्यात दोन बदल केले. स्पिनर शाहबाज नदीम आणि वॉशिंगटन सुंदर यांना पहिला सामन्यात संधी दिली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊ न शकलेला वेगवान गोलंदाज इशांत शर्मा या सामन्यासाठी खेळणार आहे.
कुलदीप यादवची प्लेइंग इलेवनसाठी निवड होईल अशी अपेक्षा सर्वांनाच होती. तर अक्षय पटेलच्या जागी शाहबाज नदीमची निवड करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पहिल्या कसोटीसाठी नदीमला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करत आल्यानं सर्वांनाच आश्चर्य वाटलं.
नदीने 2019च्या रांची कसोटी सामन्यातून पदार्पण केलं. दुसऱ्यावेळी त्याला आपत्कालीन परिस्थितीमुळे भारतीय संघात संधी मिळाली. त्यानंतर 2019 मध्ये दक्षिण अफ्रीकेविरुद्ध झालेल्या 3 सामन्यांमध्ये त्य़ाला संधी देण्यात आली नव्हती.
त्यावेळी नदीम कर्नाटकातील झारखंडकडून विजय हजारे ट्रॉफीसाठी खेळत होता. तिसर्या कसोटीपूर्वी कुलदीप यादव जखमी झाला. त्यामुळे कुलदीप ऐवजी नादीमला संधी देण्यात आली. 14 महिन्यांनंतर नादीमला पुन्हा दुसरी कसोटी खेळण्याची संधी मिळली होती. सामन्याआधी अक्षय पटेलला डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. अशा स्थितीत लेगस्पिनर राहुल चहर आणि नदीम संघात समाविष्ट करण्यात आलं.
नादीने 16 वर्षांपूर्वी केरळ विरुद्ध सामन्यात खेळला होता. आतापर्यंत 117 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 443 विकेट्स घेतल्या आहेत. 109 लिस्ट अ सामन्यांमध्ये 151 तर 134 टी-20 सामन्यात 110 विकेट्स घेतल्या आहेत. आतापर्यंत नादीमने आपल्या नावावर 704 विकेट्स केल्या आहेत.
भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यामध्ये पुन्हा एकदा नादीमला संधी मिळाली आहे. त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी तर आहेच पण विशेष म्हणजे नादीम आपत्कलीन स्थित सर्वांना आठवतो. आता देखील त्याला सामन्यासाठी संधी दिल्यानं त्याची चर्चा आहे. तर त्याच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.