Ind vs Ban : उमेश यादवची बुलेटच्या वेगाने गोलंदाजी, हवेत इतका उंच उडाला स्टंप, पाहा VIDEO

Ind vs Ban : दरम्यान टीम इंडियाला (Team India) आता बांगलादेशच्या (bangladesh) फक्त दोनच विकेट काढायच्या आहेत. या विकेट काढल्यानंतर बांगलादेशवर फॉलऑनची नामुष्की ओढवणार आहे. 

Updated: Dec 15, 2022, 07:09 PM IST
Ind vs Ban : उमेश यादवची बुलेटच्या वेगाने गोलंदाजी, हवेत इतका उंच उडाला स्टंप, पाहा VIDEO title=

India vs Bangladesh : बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाने बॅटींगनंतर बॉलिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. टीम इंडियाने (Team India) प्रथम बॅटींगकरून 404 धावा केल्या आहेत. यानंतर बॅटींगला उतरलेल्या बांगलादेशच्या (bangladesh) भाऱतीय बॉलर्सने 8 विकेट काढल्या आहेत. आजचा दुसरा दिवस टीम इंडियाचा ठरला आहे. कारण टीम इडियाच्या बॅटसमन आणि बॉलर्सने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 

हे ही वाचा: सुर्यकुमार यादव 'विक्रमाधीश'! 2022 वर्षात 'या' रेकॉर्डसवर कोरलं नाव 

उत्कृष्ट गोलंदाजी 

टीम इंडियाच्या (Team India) बॉलर्सनी पहिल्या टेस्ट सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. मोहम्मद सिराजने 3 कुलदीप यादवने 4 विकेट तर उमेश यादवने (Umesh yadav) 1 विकेट घेतला आहे.मात्र सर्वाधिक चर्चा या बॉलर्समध्ये उमेश यादवची होतेय. 

हे ही वाचा: Team India ला हरवल्यानंतर दुकानदाराने फुकट वस्तु दिल्या,पाकिस्तान खेळाडूने सांगितला 'तो' किस्सा

उमेश यादवची विकेट

टीम इंडियाला पहिला विकेट मोहम्मद सिराजने मिळवून दिला. सिराजने नजमुल हुसेन शांतोला शुन्य धावावर बाद केले. यानंतर उमेश यादवने (Umesh yadav) यासिर अलीला (4) धावावर बाद केले. उमेश यादवने बुलेटच्या वेगाने बॉल टाकत त्याला बोल्ड केले होते. त्याने हा बॉल इतका वेगाने टाकला होता की, खेळाडू बोल्ड झाला आणि स्टंप उंचावर उडाला होता. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.

सिक्सची चर्चा 

उमेश यादवने (Umesh yadav) याआधी बॅटींगमध्येही कमाल केली आहे. त्याने 15 धावा केल्या आहेत.या 15 धावात त्याने 2 गगनचुंबी सिक्स मारले आहेत. त्याच्या या सिक्सची देखील चर्चा रंगली आहे. तसेच याच सिक्समुळे तो ट्विटवर ट्रेंडमध्ये आला आहे.  

टीम इंडियाचा पहिला डाव 

चट्टोग्राम कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला पहिल्या डावात 404 धावा करता आल्या. चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 90 धावा तर श्रेयस अय्यरने 86 आणि रविचंद्रन अश्विनने 58 धावांचे योगदान दिले. या तीन फलंदाजांशिवाय पंतने 46 आणि कुलदीप यादवने 40 धावा केल्या आहेत. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराज आणि तैजुल इस्लाम यांनी सर्वाधिक 4-4 विकेट घेतले. 

बांगलादेशने टेकले गुडघे

टीम इंडियाच्या (Team India) ब़ॉलर्सने बांगलादेशची अवस्था खुपच बिकट करून ठेवली आहे. दिवस संपेपर्यत 133 धावात टीम इंडियाने 8 विकेट काढल्या आहेत. मोहम्मद सिराजने 3 कुलदीप यादवने 4 विकेट तर उमेश यादवने (Umesh yadav) 1 विकेट घेतली आहे.

दरम्यान टीम इंडियाला (Team India) आता बांगलादेशच्या (bangladesh) फक्त दोनच विकेट काढायच्या आहेत. या विकेट काढल्यानंतर बांगलादेशवर फॉलऑनची नामुष्की ओढवणार आहे.