IND vs BAN 3rd ODI : टीम इंडियाचा स्टार आणि युवा फलंदाज ईशान किशनने (ishan kishan) बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात खणखणीत दीड शतक ठोकलं आहे. या त्याच्या तुफानी खेळीने टीम इंडिया (Team india) एका चांगल्या धावसंख्येपर्यत पोहोचली आहे. दरम्यान ईशान किशनच्या या दीड शतकी खेळीचे क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. (ind vs ban 3rd odi ishan kishan hit century against bangladesh odi series virat kohli rohit sharma team india vs bangladesh)
बांगलादेश (bangladesh) विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात ईशान किशनने (ishan kishan) शतक ठोकले आहे. 86 बॉलमध्ये त्याने हे शतक मारले आहे. या खेळीत त्याने 14 फोर आणि 2 सिक्स लगावले आहेत. त्याच्यासोबत विराट कोहली देखील मैदानावर असून त्याने देखील अर्धशतक ठोकले आहे. विराट कोहलीने 54 बॉलमध्ये अर्धशतक ठोकले आहे. या दोघांमध्ये खुप चांगली पार्टनरशीप झाली आहे. याचा फायदा टीम इंडियाच्या धावसंख्येवर होणार आहे.
ईशान किशनने (ishan kishan) 86 बॉलमध्ये शतक ठोकले होते. त्यानंतर पुढच्या 17 बॉलमध्ये त्याने शतक ठोकले आहे. या खेळीत त्याने 18 फोर आणि 9 सिक्स लगावले आहे. तसेच ईशान आणि विराटमध्ये 200 धावांची पार्टनरशीप झाली आहे. तर टीम इंडियाची धावसंख्या 30 ओव्हरमध्ये 1 बाद 246 इतकी झाली आहे.
दरम्यान बांगलादेश (bangladesh) विरूद्धच्या सुरूवातीच्या दोन वनडे सामन्यात टीम इंडियाची (Team india) ओपनिंग जोडी अपयशी ठरत होती. संघाला मोठी धावसंख्या करून देण्यात दोन्ही सलामीचे फलंदाज अपयशी ठरत होते. मात्र आता तिसऱ्या वनडे सामन्यात ईशान किशनला (ishan kishan) ओपन करण्याची संधी मिळाल्याने, त्याने या संधीचा फायदा उचलत शतक ठोकले आहे. त्याच्या या शतकी खेळीने टीम इंडिया एक चांगली धावसंख्या गाठणार आहे.