'ओए X* झोपलेत सगळे...' रोहित शर्मा भडकला, स्टंप माईकमध्ये सगळंच झालं रेकॉर्ड Video

IND VS BAN 1st Test Rohit Sharma Abusing Players : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून रोहित शर्मा भर मैदानात खेळाडूंना शिव्या घालताना दिसतो आहे. 

पुजा पवार | Updated: Sep 21, 2024, 02:02 PM IST
'ओए X* झोपलेत सगळे...' रोहित शर्मा भडकला, स्टंप माईकमध्ये सगळंच झालं रेकॉर्ड Video title=
(Photo Credit : Social Media)

India VS Bangladesh 1st Test : चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश टेस्ट सीरिज मधला पहिला सामना खेळवला जात आहे. पहिल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशीही टीम इंडिया मजबूत स्थितीत असून आता बांगलादेश समोर विजयासाठी ५०८ धावांचं आव्हान आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा या सामन्यात झालेल्या दोन्ही इनिंगमध्ये फलंदाजीत फ्लॉप ठरला. त्यामुळे रोहितला सध्या अनेकजण ट्रोल करत आहे. असे असतानाच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून रोहित शर्मा (Rohit Sharma) भर मैदानात खेळाडूंना शिव्या घालताना दिसतो आहे. 

रोहित शर्मा भडकला : 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा बांगलादेश विरुद्ध चेन्नईत सुरु असलेल्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा आहे. यात टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरली होती. तेव्हा रोहित शर्मा फिल्डिंग सेट करण्यासाठी खेळाडूंना मैदानात आवाज देत होता. मात्र काही खेळाडूंचे त्याच्याकडे लक्षच नव्हते. तेव्हा रोहित भडकला आणि त्याने शिवी देत म्हंटले, "ओए X* सगळे झोपलेत...." . रोहित शर्माचं हे बोलणं स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालं. सध्या हाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. यापूर्वीही रोहित शर्माचे स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालेल्या क्लिप व्हायरल झाल्या होत्या. 

पाहा व्हिडीओ : 

 

पंत - गिलचं शतक :

बांगलादेश विरुद्ध फलंदाजीच्या पहिल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली यांसारखे दिग्गज फलंदाज स्वस्तात बाद झाल्यावर दुसऱ्या इनिंगमध्ये युवा खेळाडूंनी टीम इंडियाची बाजू सांभाळली. तिसऱ्या दिवशी पंत आणि गिलने जवळपास 150 हुन अधिक धावांची पार्टनशीपकरून टीम इंडियाची आघाडी 500 धावांपर्यंत पोहोचवली. गिलने 176 बॉलवर नाबाद 119 धावा केल्या. तर पंतने 128 बॉलमध्ये 109 धावा केल्या. या दरम्यान त्याने 13 चौकार आणि 4 सिक्स ठोकले. 

हेही वाचा : ऋषभ पंतचं दणदणीत शतक, एम एस धोनीच्या 'या' विक्रमाशी केली बरोबरी

भारताची प्लेईंग 11:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज

बांगलादेशची प्लेईंग 11: 

शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा